शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

दुकाने बंद असल्याने गरजूंची ‘मोड’साठी होतेय भटकंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:28 IST

नंदुरबार : लाॅकडाऊनमुळे सराफा व्यावसायिक रसातळाला आला आहे. कोट्यवधींची उलाढाल ठप्प झाली आहे. सराफा दुकानेही बंद असल्याने गोरगरीब, गरजूंना ...

नंदुरबार : लाॅकडाऊनमुळे सराफा व्यावसायिक रसातळाला आला आहे. कोट्यवधींची उलाढाल ठप्प झाली आहे. सराफा दुकानेही बंद असल्याने गोरगरीब, गरजूंना पैशांची गरज असल्याने ते मोड देण्यासाठी फिरतात. पण प्रशासनाच्या आदेशानुसार, दुकाने बंद असल्याने आपणही हतबल असल्याची भावना सराफा व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे.

दोन हजारावर कारागिरांचे हाल-सुनील सोनार

नंदुरबार शहरात सराफांची सुमारे १०० दुकाने असली तरी सराफा व्यावसायाशी अनेक घटकांचा संबंध येतो. एखादा दागिना बनवायचा म्हटला तर त्याच्याशी संबंधित अनेक कारागीर असतात. अशा जवळपास दोन ते तीन हजार कारागिरांचा या व्यवसायात हातभार लागला आहे. हे सर्व कारागीर गरीब आहेत. त्यातही चांदीचे काम करणाऱ्या कारागिरांचे ‘बंद’मुळे हाल होत आहेत. यात बंगाली कारागिरांचाही समावेश आहे. गत ११ दिवसात कोट्यवधींची उलाढाल ठप्प झाली, असे नंदुरबार शहर सराफ असोसिएशनचे अध्यक्ष सुनील प्रल्हाद सोनार यांनी सांगितले.

सराफा दुकानांनाही सवलत द्यावी-मनोज सराफ

सराफा व्यवसाय हा कोरोना स्प्रेडर नाही. दुकानांमध्ये मोजके लोक असतात. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने या व्यावसायिकांसाठी इतरांप्रमाणे आठवड्यातील चार दिवस दररोज चार ते पाच तास दुकाने उघडी ठेवण्यासाठी सवलत द्यावी. सध्या कोरोना काळात गरजूंना पैशांची गरज भासते. अनेक गोरगरीब आपल्याकडील सोन्या-चांदीचा दागिना मोडून पैशांची गरज भागवतात. परंतु नेमका सराफा व्यवसाय बंद असल्याने ते सराफा बाजारातून परत जात आहेत. बंदमुळे दुकाने उघडी करून त्यांची मोडही स्वीकारू शकत नाही व त्यांची गरज भागवू शकत नाही, याचे वाईट वाटते. यासाठी प्रशासनाने सराफा व्यावसायिकांनाही सवलत द्यावी, अशी मागणी नंदुरबार जिल्हा सराफा असोसिएशनचे अध्यक्ष मनोज दीनानाथ सराफ यांनी केली आहे.