शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
2
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
3
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
4
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?
5
नासाला तगडे आव्हान; ISRO आणि रशियाची ROSCOSMOS एकत्र आली, 'या' मोहिमेवर करणार काम...
6
Nagpur Politics: भाजपची पकड 'मजबूत', १२० जागांचा आकडा आधीच जाहीर; ठाकरेंच्या नेतृत्वाची पुन्हा 'परीक्षा'
7
'नमामि गंगे'चा जगाला आदर्श; 'स्टॉकहोम वॉटर वीक'मध्ये नदी संवर्धनासाठी भारताचे कौतुक
8
'भारताने रशियाचे तेल घेणे बंद केले नाही तर...', ट्रम्प यांच्या सल्लागाराने भारत सरकारला आणखी टॅरिफ वॉरची धमकी दिली
9
Navi Mumbai Traffic: मराठा मोर्चा नवी मुंबईच्या वेशीवर, वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद, कोणते खुले?
10
संजय गायकवाडांच्या आमदारकीचं काय होणार? ठाकरेंच्या नेत्याने ठोठावले उच्च न्यायालयाचे दार
11
पत्नीचा संताप अनावर झाला, पतीच्या तोंडावर फेकली उकळती चहा; नेमकं झालं तरी काय?
12
संभल समितीनं CM योगींना सादर केला अहवाल, करण्यात आले खळबळजनक खुलासे; जिल्ह्यात फक्त १५% हिंदू उरले!
13
निक्की भाटी प्रकरणात वृद्ध शेजाऱ्याने केला धक्कादायक खुलासा; म्हणाला, 'निक्की जळत होती तेव्हा विपिन...'
14
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
15
१ वर्षात केली स्पर्धा परीक्षेची तयारी, पहिल्याच प्रयत्नात यश; MBBS डॉक्टर बनली IAS अधिकारी
16
केस कलर करण्याची हौस बेतली जीवावर; तरुणीसोबत घडलं भयंकर, अवस्था पाहून बसेल धक्का
17
TCS-एचसीएलसह आयटी क्षेत्रात 'भूकंप'! बाजार ७०६ अंकांनी घसरला; या कारणामुळे मोठी घसरण
18
४ महिन्यांपूर्वी झाले होते लग्न, क्षणार्धात मोडले सुखी संसाराचे स्वप्न; वैष्णो देवी दुर्घटनेत चांदनीने गमावला जीव
19
"माझी एवढीच अपेक्षा आहे की कुठलेही..."; मनोज जरांगेंच्या आंदोलनावर CM फडणवीसांनी मांडली स्पष्ट भूमिका
20
'चिता' झेपावला, जवान बनले 'देवदूत'; मृत्यूच्या दाढेतून २७ जणांना बाहेर काढले, पूरग्रस्त भागात लष्कराची सेवा

अक्कलकुव्यात दुकानाला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2020 12:44 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अक्कलकुवा : शहरातील फेमस चौकात किराणा दुकानाला आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले़ रविवारी दुपारी १ ...

लोकमत न्यूज नेटवर्कअक्कलकुवा : शहरातील फेमस चौकात किराणा दुकानाला आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले़ रविवारी दुपारी १ वाजता ही घटना घडली़ आग विझवण्यात नागरिकांना यश आले असून यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही़ उशिरापर्यंत पोलीसांकडून पंचनामा सुरु होता़ नुकसानीच्या आकड्यांची जुळवाजुळव सुरु होती़फेमस चौकातील फेमस किराणा दुकानाला दुपारी एक वाजेच्या सुमारास आग लागल्याचे नागरिकांना दिसून आले़ शॉर्टसर्किटमुळे ही लागल्याचे सांगण्यात आले़ दरम्यान तातडीने तळोदा येथील अग्निशामन बंबाला माहिती देण्यात आली़ बंद अर्ध्या तासात येथे पोहोचल्यानंतर नागरिकांसह बंबाने तासाभरात आग आटोक्यात आणली़ आगीत किराणा दुकानातील लाखो रुपयांच्या किराणामाल जळून खाक झाला़ घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम, प्रभारी तहसीलदार विजय कच्छवे, पोलीस निरीक्षक मेघशाम डांगे, पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक डी़डी़पाटील, पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर बडगुजर दाखल झाले होते़ आग विझवण्यासाठी तसेच आगीच्या घटनेची माहिती शहरात वाऱ्यासारखी पसरल्याने या परिसरात मोठी गर्दी जमली होती़ पोलीस हजर झाल्यानंतर अनेकांनी घराची वाट धरली़संचारबंदी काळात आग लागल्यानंतर शेकडोंच्या संख्येने जमाव या ठिकाणी हजर झाला होता़ यातून संचारबंदीचे उल्लंघन झाल्याची चर्चा होती़ या नागरिकांवर येत्या काळात कारवाई होते किंवा कसे याकडे लक्ष लागून राहणार आहे़ दरम्यान शहरात शनिवारी पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत यांनी भेट देत जामिया संकुलातील विद्यार्थ्यांची भेट घेतली होत़ी़ त्यांनी संपूर्ण पडताळणी करुन संस्थेकडून माहिती दिल्यानंतर पोलीस अधिक्षक पंडीत यांनी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला़