शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

रॉकेलचा पुरवठा बंद केल्याने शहादा तालुक्यात नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2019 12:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : शहरासह ग्रामीण भागात रॉकेलचा पुरवठा बंद केल्याने ग्रामीण भागात प्रशासनाच्या विरोधात तीव्र नाराजीचा सूर ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : शहरासह ग्रामीण भागात रॉकेलचा पुरवठा बंद केल्याने ग्रामीण भागात प्रशासनाच्या विरोधात तीव्र नाराजीचा सूर उमटत आहे. जिल्ह्यातील सर्व तालुक्यात रॉकेलचा पुरवठा सुरू असताना केवळ शहादा तालुक्यातील रॉकेल पुरवठा बंद करून सावत्रपणाची वागणूक दिली असून या प्रकरणाची चौकशी करून शहादा तालुक्याला त्वरित रॉकेलचा पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी असून नागरिक आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत.जिल्ह्यात नंदुरबार, नवापूर, अक्कलकुवा, तळोदा ,धडगाव या तालुक्यांमध्ये ऑक्टोबर महिन्यात रॉकेलचा पुरवठा केल्याची माहिती मिळाली आहे. मात्र शहादा तालुक्यासाठी जो पुरवठा तक्ता आहे त्याच्यामध्ये निरंक पुरवठा दाखवला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहाद्याचे तत्कालीन तहसीदारांनी जिल्हाधिका:यांना दिलेल्या लेखी अहवालात शहादा शहराला व ग्रामीण भागाला रॉकेलची आवश्यकता नाही,  असे म्हटले आहे. अर्थात त्या अधिका:यांनी कोणत्या आधारावर तो अहवाल पाठवला याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. वास्तविक पुरवठा विभागाने शहादा शहर व संपूर्ण तालुक्यातील रॉकेल परवानाधारकांना किती रॉकेल लागते, रॉकेलची आवश्यकता नाही का याची चौकशी करणे गरजेचे होते. शासनाने रॉकेलच्या पुरवठय़ात कपात केली आहे, प्रत्येक परवानाधारकांना पुरवठा कमी करण्यात आलेला आहे त्याबद्दल दुमत नाही. ती प्रशासनाची कायदेशीर बाब आहे. मात्र जिल्ह्यात सर्व तालुक्यांना रॉकेलचा पुरवठा होत असताना केवळ शहादा तालुक्याला रॉकेल पुरवठा न करता सावत्रपणाची वागणूक देण्यात आल्याने नाराजीचा सूर उमटत आहे.एका बाजूला केंद्र शासनाने उज्वला योजनेमार्फत ग्रामीण भागात गॅस पुरवठा करण्यात आला पण आजच्या परिस्थितीमध्ये चौकशी केली असता शहादा तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये 100 टक्के उज्वला गॅस योजनेचे गॅस वाटप करण्यात आलेले नाही. असे असताना रॉकेल पुरवठा बंद करण्यात आला. ज्यांच्याकडे अद्याप गॅस नाही त्यांनी काय करावे. श्रमिक, शेतमजूर आदिवासींना रॉकेल जीवनावश्यक बाब आहे. त्यांना रॉकेल मिळत नसल्याने त्यांची भटकंती सुरू आहे.