शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेने झुंजवूनही भाजपने राखले तालुक्यावर वर्चस्व!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2020 12:28 IST

मनोज शेलार । लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्हा परिषदेच्या दहा गटापैकी सात गटांवर विजय मिळवीला असला तरी पंचायत ...

मनोज शेलार ।लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्हा परिषदेच्या दहा गटापैकी सात गटांवर विजय मिळवीला असला तरी पंचायत समितीवर सत्ता स्थापनेसाठी भाजपसह विरोधी पक्षांनाही कसरत करावी लागणार आहे. आमदार डॉ.विजयकुमार गावीत यांनी तालुक्यात आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. शिवसेनेचे धणुष्यबाण हाती घेवून निवडणुकीला सामोरे गेलेल्या माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांना आणखी मेहनत घ्यावी लागणार असल्याचे स्पष्ट आहे.विधानसभा निवडणुकीनंतर राजकीय वर्चस्व प्रस्थापीत करण्यासाठी आमदार डॉ.विजयकुमार गावीत व माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्यात प्रतिष्ठा पणाला लागली होती. दोन्ही नेत्यांचे विधानसभा निवडणुकीतील वेल्डींग राज्यातील सत्ता स्थापनेनंतर तुटले. परिणामी जिल्हा परिषदेवर आणि नंदुरबार पंचायत समितीवर सत्ता स्थापनेसाठी दोन्ही नेत्यांनी प्रतिष्ठा पणाला लावली. राष्टÑवादीने देखील चार गटात उमेदवार दिले, परंतु चारही ठिकाणी पराभव पत्करावा लागला.काँग्रेस सोडून शिवधणुष्य हाती घेवून आपले वर्चस्व तालुक्यावर परिणामी पुन्हा जिल्ह्यावर स्थापीत करण्यासाठी माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी राजकीय डावपेच आखले. तीन ठिकाणी शिवसेना उमेदवार न देता आपल्याच कार्यकर्त्यांना काँग्रेसची उमेदवारी देवून निवडून आणण्याचा प्रयत्न केला. पैकी एका ठिकाणी त्यांना यश आले. शिवनेसेनेचे तालुक्यात काहीही अस्तित्व नसतांना, धणुष्यबाण चिन्ह जनतेच्या मनात रुजलेले नसतांनाही आव्हान पेलून रघुवंशी यांनी तालुक्यात सर्वदूर शिवसेना पोहचविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या दोन गटात आणि पंचायत समितीच्या सहा गणात आणि एक पुरुस्कृत उमेदवार अशा सात ठिकाणी त्यांनी उमेदवार निवडून आणले. पंचायत समितीत रघुवंशी गटाला गेल्या दोन पंचावार्षीकपासून बहुमत मिळविता आले नाही. गेल्या पंचवार्षीकच्या दुसऱ्या अडीच वर्षात त्यांच्या गटाची सत्ता आली असली तरी राष्टÑवादीच्या सदस्यांना फोडून ती स्थापन करण्यात आली होती. यावेळी त्यांनी पंचायत समितीवर सत्ता स्थापन व्हावी यासाठी पुरेपूर प्रयत्न केले होते. परंतु आमदार डॉ.विजयकुमार गावीत यांनी आपले एकहाती वर्चस्व कायम राखले. त्यांच्याच घरातील जिल्हा परिषदेत चार तर पंचायत समितीत दोन सदस्य निवडून आले आहेत. राष्टÑवादीचे तालुक्यातील उरले सुरले अस्तित्व देखील आता संपण्याच्या मार्गावर आहे. गटातील एक जागा येण्याची शक्यता असतांना ती देखील आली नाही. पंचायत समितीत देखील पक्षाला खाते उघडता आले नाही.एकुणच पंचायत समितीत कुणालाही बहुमत मिळविता आले नाही, त्यामुळे जिल्हा परिषदेप्रमाणेच नंदुरबार पंचायत समितीत देखील स्पर्धा होणार हे स्पष्ट आहे.तालुक्यातील निकालाचे वैशिष्ट्ये म्हणजे गावीत परिवारातील चार सदस्य निवडून आले आहेत. गटातत चार तर गणात एक सदस्याचा समावेश आहे. अर्चना गावीत या गटातून आणि गणातूनही निवडून आल्या आहेत. त्यामुळे पंचायत समितीची सत्ता भाजपची आली तर सभापतीपदासाठी त्या गटाचा राजीनामा देवू शकतात.शिवसेनेतर्फे निवडून आलेले अ‍ॅड.राम रघुवंशी हे उपाध्यक्षपदाचे प्रमुख दावेदार आहेत. त्यामुळे वेळ आल्यास अध्यक्ष व उपाध्यक्ष देखील नंदुरबार तालुक्यातीलच राहण्याची शक्यता आहे.यंदाच्या निवडणुकीत कुठलाही असा प्रभावी मुद्दा नव्हता. केवळ स्थानिक मुद्यांवर निवडणूक लढविली गेली.भाजप आणि शिवसेनेत सरळ लढती झाल्या. परंतु काही ठिकाणी काँग्रेस व राष्टÑवादीनेही चांगली लढत देवून चुरस निर्माण झाली होती.रनाळे गटातील विजयी उमेदवाराला अवघा ५१ मतांचा लीड मिळाला. या ठिकाणी राष्टÑवादीच्या उमेदवाराने १,७३३ मते घेतल्याने भाजप उमेदवाराला पराभव पहावा लागला.