शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

शेल्टर होममध्ये 116 जणांचा मुक्काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2020 12:46 IST

लोकमत न्यूज नेटवर्क खापर : लॉकडाऊन घोषित झाला आणि घराकडे जाण्याची ओढ लागली. भविष्याची चिंता मनात होतीच पण घरी ...

लोकमत न्यूज नेटवर्कखापर : लॉकडाऊन घोषित झाला आणि घराकडे जाण्याची ओढ लागली. भविष्याची चिंता मनात होतीच पण घरी पोहोचता आले नाही तर काय? हा प्रश्न जास्त कठीण होता. तसा आमचा प्रवास सुरू झाला. महाराष्ट्राच्या सीमेवर आम्हाला थांबविण्यात आल्यानंतर मोठी समस्या समोर आल्यासारखे वाटले पण इथे घरात राहतो तशा सुविधा मिळाल्या आणि माणसांची वागणूक चांगली असल्याने घरापासून असलेला दुरावाही सुसह्य झाला. बंगळूरू येथून राजस्थानकडे निघालेल्या एका कामगाराची ही प्रतिक्रीया राज्य शासन आणि नंदुरबारच्या प्रशासन करीत असलेल्या मदतकार्यातील संवेदनशिलता स्पष्ट करणारी आहे. महाराष्ट्र, गुजरात येथून आलेल्या इतरही नागरिकांच्या प्रतिक्रीया अशाच आहेत. परप्रांतातील 116 व्यक्तींची खापर येथील विलगीकरण कक्षाच्या ठिकाणी निवा:याची सोय करण्यात आली आहे. कोरोनाच्या संसर्गापासून नागरिकांचा बचाव करण्यासाठी शासन करीत असलेल्या प्रय}ांचा एक भाग म्हणून जरी जिल्हाबंदी करण्यात आली असली तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निर्देशानुसार बाहेरील राज्यातील किंवा जिल्ह्यातील नागरिकांची जिल्ह्यात चांगली व्यवस्था करण्यात आली आहे. जिल्ह्यात बाहेरील जिल्ह्यातील आणि प्रांतातील एकूण 206 व्यक्तींची सोय तात्पुरत्या निवा:यात करण्यात आली आहे. गुजरात सीमेकडून जाणा:या कामगारांची व्यवस्था खापर येथील शासकीय मुलींच्या वसतिगृहात तयार करण्यात आलेल्या तात्पुरत्या निवारा केंद्रात आहे. यात महिला व बालकांचाही समावेश आहे. प्रशासनाने या केंद्रात त्यांना सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या         आहेत. वसतिगृहाच्या दोन इमारतीतील 14 कक्षात ही व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येकाला स्वतंत्र कॉट, सॅनिटायझर, हात धुण्यासाठी साबण, भोजन, नाश्ता, नियमित वैद्यकीय तपासणी, मनोरंजनासाठी टीव्ही अशा सर्व सुविधा येथे उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. क्वारंटाईन केलेल्या दोन व्यक्तींना स्वतंत्र कक्षात ठेवण्यात आले आहे. त्यांचा अहवाल निगेटीव्ह आला आहे. आवश्यकता असल्यास रुग्णवाहिकादेखील सज्ज ठेवण्यात आली आहे. प्रशासनासोबत स्वयंसेवी संस्था आणि स्थानिक नागरीकदेखील मदतीला पुढे सरसावले आहेत. परराज्यात माणुसकीच्या ओलाव्याने या सर्वाना आपलेसे केले आहे. घराची ओढ तर आहेच, पण अनोळखी व्यक्तींचा कुटुंबाप्रमाणे मिळणारा स्नेहदेखील तेवढाच हवासा वाटणारा आहे.‘अन्नासाठी दाही दिशा..’ अशी भावना लॉकडाऊननंतर यांच्या मनात आली असेलही पण इथल्या वास्तव्याने ‘देणा:याचे हजारो हात’ त्यांना अनुभवायला मिळाले असतील. म्हणूनच निवा:यात थांबलेली ग्रामीण भागातील भगिनी ‘बठा व्यवस्था होई राहीना, काय टेन्शन नाय’ अशी खुलेपणाने प्रतिक्रया देते. संकट मोठे आहे, पण अशा लहान अनुभवातून माणसाची जवळीकता अनुभवायला मिळते आहे. देश म्हणून सर्व एकत्र उभे राहिलेले दिसतात. गावाकडचे प्रेम तर काही वेगळेच असते. त्याचाच अनुभव खापर येथील या विद्यार्थी वसतिगृहात येतो. जणू एक कुटुंब काही दिवसासाठी एकत्र आले आहे. वेदना सहन करणे कठीण असेलही, पण त्यासाठी आवश्यक असणारे बळ या निवा:याने दिले हे मात्र खरे.