शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छ भारत अभियानाची शहाद्यात ‘एैसी-तैसी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2019 19:09 IST

शहादा : राज्यासह देशभरात स्वच्छ भारत अभियान राबविले जात आहे. मात्र शहरातील व्यावसायिकांकडून रस्त्यांवरील मोकळ्या जागांवर कचरा टाकण्यात येत ...

शहादा : राज्यासह देशभरात स्वच्छ भारत अभियान राबविले जात आहे. मात्र शहरातील व्यावसायिकांकडून रस्त्यांवरील मोकळ्या जागांवर कचरा टाकण्यात येत असल्याने तेथे कचराकुंडय़ा तयार झाल्या आहेत. त्यामुळे परिसरात दरुगधी पसरत असून, याकडे पालिकेने दुर्लक्ष केल्याने नाराजी व्यक्त होत आहे. शहरातील विविध भागांमध्ये फेरफटका मारला असता बहुतेक ठिकाणी अशीच परिस्थिती दिसून आली. पालिकेतर्फे कचराकुंडी न ठेवल्याने नागरिक व व्यावसायिकांकडून उघडय़ावरच कचरा टाकण्यात येतो. त्यामुळे परिसरात दरुगधी पसरून विविध भागातील मुख्य रस्त्यांवर कच:याचे ढीग तयार झाले आहेत. एकीकडे मलेरिया, टायफाईड, डेंग्यूसारखे भयानक आजार डोकेवर काढत असतांनादेखील पालिका प्रशासन याकडे गांभीर्याने लक्ष देताना दिसून येत नाही.भाजी मंडई परिसरात असलेल्या व्यावसायिकांकडून मुख्य चौकात कचरा व नासका भाजीपाला टाकण्यात येत असल्याने कच:याचा मोठा ढीग होतो. याठिकाणी वराह व मोकाट गुरांचा वावर असल्याने दरुगधी पसरून नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे या परिसरात जाणेही कठीण झाले आहे. याठिकाणी व्यावसायिकांना समज देवून कचराकुंडी ठेवल्यास हा प्रश्न सुटू शकतो. या परिसरातील भाजीपाला विक्रेत्यांनादेखील येथेच कचरा व नासका भाजीपाला टाकण्याची सवय झाली आहे. याठिकाणी स्वच्छता केल्यास काही वेळानंतर पुन्हा ‘जैसे थे’ परिस्थिती होते. त्यामुळे रस्त्यावर कचरा टाकणा:यांवर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे.शहरातील शहीद अब्दुल हमीद चौकातील स्मारकाजवळच कचरा टाकण्यात येत असल्याने या परिसराची शोभा लयास जात आहे. तसेच पशुवैद्यकीय दवाखाना व वनविभाग कार्यालयासमोर खासदार निधीतून खेळाडूंसाठी क्रीडा भवन बांधण्यात आले आहे. हे क्रीडा भवन आता बंद अवस्थेत असल्याने त्याच्या मुख्य प्रवेशद्वारातच कचरा टाकण्यात येतो.दरम्यान, पालिकेने स्वच्छतेबाबत कायमस्वरूपी उपाययोजना करून अशाप्रकारे मुख्य रस्त्यांवर        कोणाचाही धाक न बाळगता बिनधास्तपणे रस्त्यावर कचरा टाकून शहर विद्रुप करणा:या व्यावसायिकांवर पालिकेने कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.