शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

शहाद्याचे नगरसेवक शेख यांचे पद अबाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2018 12:38 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : तिस:या अपत्याच्या कारणावरून शहादा पालिकेतील राष्ट्रवादीचे एकमेव नगरसेवक सलीम शेख यांचे सदस्यपद रद्द केल्याचा ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : तिस:या अपत्याच्या कारणावरून शहादा पालिकेतील राष्ट्रवादीचे एकमेव नगरसेवक सलीम शेख यांचे सदस्यपद रद्द केल्याचा निर्णय जिल्हाकिारी यांनी दिला होता़ या आदेशाला नगरविकास राज्यमंत्र्यांनी तात्पुरता स्थगिती आदेश दिल्याने नगरसेवक सलीम शेख यांना दिलासा मिळाला आह़े डिसेंबर 2016 मध्ये झालेल्या शहादा पालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत प्रभाग क्र.7 ब मधून शेख इकबाल शेख सलीम हे राष्ट्रवादी काँगेस पक्षातर्फे निवडून आले होत़े शेख यांनी काँग्रेसचे राकेश पाटील यांचा पराभव केला होता. निवडणुकीनंतर शेख यांना तिसरे अपत्य झाल्याने काँग्रेसचे स्वीकृत नगरसेवक मकरंद पाटील यांनी शेख यांचे नगरसेवकपद रद्द करण्याची मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती़ या तक्रारीवरुन जिल्हाधिकारी डॉ़ कलशेट्टी यांनी वेळोवेळी सुनावणी घेऊन चौकशीअंती महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम 1965 चे कलम 16 व 44 प्रमाणे शेख इकबाक शेख सलीम यांना दोन पेक्षा जास्त अपत्य असल्यामुळे अपात्र घोषित करुन प्रभाग क्र.7 ब चे सदस्यपद रिक्त असल्याचा निर्णय 20 नोव्हेंबरला दिला होता. या निर्णयाच्या विरोधात शेख यांनी राज्य सरकारकडे अपील दाखल केले होत़े त्यावर नगरविकास राज्यमंत्री यांनी जिल्हाधिका:यांच्या आदेशास पुढील आदेश येईपर्यत तात्पुरती स्थगिती दिली आहे. मंत्रालयातून हे आदेश नुकतेच प्राप्त झाले आह़े