शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

धाडसी घरफोडीमुळे शहाद्यात खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2018 12:13 IST

शहादा : बागवान गल्लीत झालेल्या धाडसी घरफोडीने शहरात भितीचे वातावरण पसरले आहे. चोरटय़ांनी व्यापा:याचे 14 लाख 50 हजार रुपये रोख चोरू नेले. केवळ रोख रक्कमच गेली. इतर वस्तूंना चोरटय़ांनी हात लावलेला नसल्यामुळे माहितीगारचे हे काम असल्याचा संशय पोलिसांना आहे. पोलिसांनी तीन संशयीतांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.बागवान गल्लीत राहणारे व गांधी ...

शहादा : बागवान गल्लीत झालेल्या धाडसी घरफोडीने शहरात भितीचे वातावरण पसरले आहे. चोरटय़ांनी व्यापा:याचे 14 लाख 50 हजार रुपये रोख चोरू नेले. केवळ रोख रक्कमच गेली. इतर वस्तूंना चोरटय़ांनी हात लावलेला नसल्यामुळे माहितीगारचे हे काम असल्याचा संशय पोलिसांना आहे. पोलिसांनी तीन संशयीतांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.बागवान गल्लीत राहणारे व गांधी पुतळ्याजवळ रेडीमेड कापडाचे दुकान असलेले व्यापारी मोहमद हारून मोहम्मद खात्री यांच्या घरी ही घटना घडली. व्यापारासाठीचे 14 लाख 50 हजार रुपये त्यांनी घरातील गोदरेज कपाटात ठेवले होते. घरात चार भाऊ राहतात. सोमवारी सकाळी सर्वजन दुकानावर गेल्यानंतर सायंकाळी शरफोद्दीन हा पाणी भरण्यासाठी घरी गेला होता. पाणी भरून तो परत दुकानावर आला होता. रात्री दुकान बंद करून सर्व भावंड घरी गेले असता त्यांना घराचे चॅनेल गेटचे व मुख्य दरवाजाचे कुलूप तुटलेले दिसले. घरात जावून तपास केला असता लोखंडी कपाटाचे कुलूप देखील चोरटय़ांनी तोडलेले होते. कपाटात दोन स्टिलच्या डब्यात ठेवलेले 14 लाख 50 हजार रुपये रोख घेवून चोरटय़ांनी पोबारा केल्याचे स्पष्ट झाले. मोहमद खात्री यांनी तातडीने पोलिसांना कळविले. पोलीस निरिक्षक संजय शुक्ल यांनी घटनास्थळी भेट दिली. श्वान पथक, ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले. मंगळवारी दुपारी याबाबत चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पोलिसांनी तीन तरुणांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्याचे पोलीस निरिक्षक शुक्ला यांनी सांगितले.दरम्यान, शहारासह परिसरात चोरीचे प्रमाण वाढले असून पोलिसांनी चोरटय़ांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.