शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
2
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
3
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
4
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
5
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
6
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
7
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
8
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
9
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
10
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
11
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
12
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
13
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
14
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
15
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
16
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
17
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
18
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
19
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
20
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...

शहाद्यात वीज कंपनीच्या अधिका:यांना घेराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 12:38 IST

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : मीटर बसविण्यापूर्वी वीज बिलांची वसुली व मीटर रिडींग न घेता अव्वाचा सव्वा बिले पाठवून ग्राहकांची लूट करणा:या वीज वितरण कंपनीच्या शहादा येथील कार्यालयावर वाडी, चिखली व नर्मदानगर पुनर्वसन वसाहतीतील नागरिकांनी मोर्चा काढून तब्बल  चार तास कार्यकारी अभियंत्यांना घेराव घालून त्यांच्या दालनात ठिय्या आंदोलन केल्याने केल्याने अधिका:यांची ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : मीटर बसविण्यापूर्वी वीज बिलांची वसुली व मीटर रिडींग न घेता अव्वाचा सव्वा बिले पाठवून ग्राहकांची लूट करणा:या वीज वितरण कंपनीच्या शहादा येथील कार्यालयावर वाडी, चिखली व नर्मदानगर पुनर्वसन वसाहतीतील नागरिकांनी मोर्चा काढून तब्बल  चार तास कार्यकारी अभियंत्यांना घेराव घालून त्यांच्या दालनात ठिय्या आंदोलन केल्याने केल्याने अधिका:यांची तारांबळ उडाली. अखेर ग्राहकांना अधिका:यांनी बिलाची रक्कम परत करीत बिलांची चालू रिडींगनुसार दुरुस्ती करुन लेखी पत्र आंदोलनकत्र्याना दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.वाडी, चिखली, नर्मदानगर, त:हावद या पुनर्वसन वसाहतीत वीज वितरण कंपनीकडून अवाजवी बिलांची आकारणी सुरु आहे.               वाडी येथील नर्मदा जीवन या             निवासी आदिवासी विद्याथ्र्याच्या शाळेला जास्तीचे बिले देण्यात              आले. सहा ग्राहकांना चक्क वीज  मिटर बसविण्यापूर्वीच बिलांची आकारणी करण्यात आली. त्यातील मालसिंग गुलाबसिंग पावरा व             खेमा रेन्या पावरा या ग्राहकांकडून मीटर बसविण्यापूर्वीच बिलाची  रक्कम वसूल करण्यात आली. कंपनीच्या ठेकेदाराकडून वसाहतीत जाऊन रिडींग न घेता कार्यालयात बसूनच मीटर रिडींग दाखवून अवाजवी बिले वसुल करण्याचा प्रकार सुरु आहे. शासनाने पुनर्वसन केलेल्या बाधितांकडून वीज वितरण कंपनीकडून अशाप्रकारे आर्थिक लूट सुरु आहे. यासंदर्भात वीज           कंपनीच्या अधिका:यांकडे तक्रारी करुनही दुर्लक्ष होत असल्याने नर्मदा बचाव आंदोलकांचा संयम तुटला. आंदोलनाच्या लतिका राजपूत, चेतन साळवे, कांतीलाल पावरा, राहत्या पावरा, सुनील पावरा यांच्यासह कार्यकत्र्यानी शहादा वीज कंपनीच्या कार्यालयावर मोर्चा नेला. मोर्चात विद्याथ्र्याचाही सहभाग होता. आंदोलनकत्र्यानी या वेळी वीज  बिलांची होळी  केल्यानंतर कार्यकारी अभियंता धनंजय भामरे यांच्या दालनात ठिय्या आंदोलन सुरु केले. त्यावेळी अतिरिक्त कार्यकारी अभियंता एस.व्ही. कुराडे, उपाभियंता आर.एम. मोरे यांना घेराव घातल्यानंतर कार्यकारी अभियंता भामरे आल्याशिवाय आंदोलन मागे न घेण्याचा पवित्रा आंदोलकानी घेतला होता. मात्र कार्यकारी अभियंत्यांशी चर्चा झाल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.