शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

शहाद्यात प्रांत कार्यालय चोरटय़ांनी फोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2018 11:47 IST

वसुलीच्या रक्कमेवर डोळा : हाती काही न लागल्याने कागदपत्रे केले अस्ताव्यस्त

शहादा : रमकूबाई नगरात प्रांताधिकारी कार्यालयात दरवाजाची कडी व कुलूप तोडून चोरांनी चोरीचा प्रय} केला. हे कार्यालय रहिवासी परिसरात असल्याने घर समजून चोरांनी चोरीचा प्रय} केल्याचा अंदाज आहे. परंतु त्यांना खाली हात परतावे लागले.गेल्या दोन दिवसांपासून शासकीय सुटी होती. परिणामी प्रांताधिकारी कार्यालयाला कुलूप होते. शनिवारी रात्री चोरटय़ांनी कार्यालयाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. चोरांनी सर्व कार्यालयातील खोल्यांची तपासणी केली असता कागदपत्र आणि संगणक आढळून आले. प्रांताधिकारी लक्ष्मीकांत साताळकर यांच्या कॅबिनमधील टेबलाचे सर्व ड्रावर तपासले असता त्यात काही आढळून आले नाही. कार्यालयातील सर्व कागदपत्रे सुस्थितीत आहेत, संगणक असून चोरांचा चोरी करण्याचा प्रय} फसला आहे. सोमवारी सकाळी कार्यालयातील महिला कर्मचारी सकाळी नऊ वाजता कार्यालय उघडण्यासाठी आले असता कर्मचा:यांनी तहसीलदार मनोज खैरनार यांना ही माहिती दिली. तहसीलदारांनी पोलीस निरीक्षक संजय शुक्ला यांना घटनेची माहिती दिली असता त्यांचे सहकारी पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर बडगुजर, पोलीस कर्मचारी जालल शेख, विकास कापुरे, स्वप्नील गोसावी, देवा गावीत यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.प्रांताधिकारी कार्यालय हे भरवस्तीत असल्याने चोरांना गेल्या दोन दिवसांपासून कुलूप    दिसल्यामुळे त्यांनी याठिकाणी चोरीचा प्रय} केला. चोरांना काहीच न  मिळाल्याने हताश होऊन परतावे लागले. शहरात चोरीच्या घटनांचा क्रम सुरूच आहे. परंतु शासकीय कार्यालयात चोरी करण्याचा  चोरांचा हा पहिलाच प्रसंग असल्याने शासकीय कार्यालयदेखील सुरक्षित नाहीत, अशा प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होत आहेत.प्रांत कार्यालयामार्फत विविध प्रकारच्या दंडांची शुल्क वसुली जोरात सुरु आहे. गुरुवारी व शुक्रवारी जमा झलेल्या दंडाची रक्कम शनिवारी व रविवारी बँकेला सुटी असल्यामुळे ती बँकेत जमा न करता ती कार्यालयात ठेवण्यात आली. नेमकी हीच संधी चोरटय़ांनी साधली. कार्यालयात मोठय़ा प्रमाणात रोख रक्कम जमा असल्याची माहिती लिक झाल्यामुळे चोरी झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. शहाद्याच्या इतिहासात पाहिल्यांदाच शासकीय कार्यालयात धाडसी चोरीचा प्रयत्न झाला.