शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

शहाद्यातील घरफोडीत अडीच लाखांचा ऐवज लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 12:30 IST

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : शहरातील डोंगरगाव रस्त्यावरील मातोश्री नगरात बंद घराच्या दरवाजाचे कडीकोयंडा तोडून चोरटय़ांनी अडीच लाख रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना रविवारी पहाटे घडली. याबाबत उशिरार्पयत पोलीस नोंद झालेली नव्हती. गेल्या 15 दिवसांपूर्वीही याच वसाहतीत चोरी झाली होती.शहरातील डोंगरगाव रस्त्यावरील मातोश्री नगरमध्ये शहादा पंचायत समितीत अभियंता असलेले कैलास रमण ढोले ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : शहरातील डोंगरगाव रस्त्यावरील मातोश्री नगरात बंद घराच्या दरवाजाचे कडीकोयंडा तोडून चोरटय़ांनी अडीच लाख रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना रविवारी पहाटे घडली. याबाबत उशिरार्पयत पोलीस नोंद झालेली नव्हती. गेल्या 15 दिवसांपूर्वीही याच वसाहतीत चोरी झाली होती.शहरातील डोंगरगाव रस्त्यावरील मातोश्री नगरमध्ये शहादा पंचायत समितीत अभियंता असलेले कैलास रमण ढोले हे पंकज हिरालाल वाडिले यांच्या बंगल्यात भाडेकरू आहेत. ते धडगाव येथे कुटुंबासह धार्मिक कार्यक्रमासाठी गेले होते. घर बंद असल्याची संधी साधून अज्ञात चोरटय़ांनी घराच्या पुढील बाजूच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. चोरटय़ांनी गोदरेज कपाटातील सामान अस्ताव्यस्त केला व लॉकर फोडले. कपाटातील 38 ग्रॅम वजनाची सोन्याची पोत, आठ ग्रॅमची सोन्याची अंगठी, पाच ग्रॅमच्या दोन अंगठय़ा, 20 ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या लहान अंगठय़ा असे 76 ग्रॅम सोन्याचे दागिने व रोख 15 हजार रुपये असा सुमारे अडीच लाख रुपयांचा ऐवज चोरटय़ांनी लांबवला.रविवारी सकाळी घराचा दरवाजा उघडा दिसल्याने शेजा:यांना संशय आला. त्यांनी घरी जाऊन पाहिले असता चोरी झाल्याचे निदर्शनास आले. त्यांनी तात्काळ कैलास ढोले यांना भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून घरात चोरी झाल्याची माहिती दिली. त्यानंतर वाडिले हे कुटुंबासह           शहादा येथे आले. घरी पोहोचल्यावर घरातील कपाट तोडून चोरटय़ांनी         रोख रक्कम सोन्याचे दागिने असा अडीच लाखांचा ऐवज चोरून नेल्याचे त्यांचे लक्षात आले. याबाबत पोलिसांत घटनेची माहिती देण्यात आली. मात्र उशिरार्पयत नोंद झालेली नव्हती. दरम्यान, 15 दिवसांपूर्वीही याच वसाहतीत चोरी झाली होती. पुन्हा रविवारी पहाटे चोरी झाल्याने या भागातील रहिवाशांमध्ये भीती निर्माण झाली आहे.