शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

शहाद्यात सहा कोटींचा व्यवहार ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2018 17:18 IST

बाजार समिती 10 दिवसांपासून बंद : शेतकरी आर्थिक संकटात, हमाल-मापाडीही बेरोजगार

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : गेल्या 10 दिवसांपासून शहादा बाजार समिती बंद असल्याने सुमारे सहा कोटी रुपयांची उलाढाल थांबली आहे. बाजार समितीचा व्यवहार ठप्प झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे तर हमालमापाडी बेरोजगार झाले आहेत.हरभरा आणि गव्हाला हमी भाव मिळावा यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केलेल्या आंदोलनामुळे गेल्या 10 दिवसांपासून शहादा बाजार समिती बंद आहे. या बंदचा परिणाम आता तालुक्याच्या एकंदरीतच अर्थकारणावर जाणवू लागला आहे. हंगामात दररोज बाजार समितीत 800 ते एक हजार क्विंटल हरभरा व तेवढाच गहू विक्रीस येत असल्याने दररोज सुमारे 50 ते 60 लाखांची उलाढाल होते. ही उलाढाल 10 दिवसांपासून बंद पडल्याने सुमारे सहा कोटीचे नुकसान झाले आहे. रोजची सुमारे 1500 ते दोन हजार क्विंटल धान्याची आवक-जावक थांबल्याने धान्याचे मोजमाप करणारे मोजमापी, हमाल यांचा रोजगार बुडाला आहे. बाजार समितीतील दीडशे हमालमापाडी बेरोजगार झाल्याने त्यांच्यासमोर त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा हा प्रश्न उपस्थित झाला आहे. बाजार समिती बंद झाल्यामुळे शेतकरी व व्यापारी यांच्यामधील आर्थिक देवाण-घेवाणही थांबल्यामुळे विशेषत: छोटे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. अडीअडचणीत शेतीमाल विकून व्यापा:यांकडून उधार उसनवारी करून शेतकरी आपली गरज भागवतात. बाजार समितीत शेतीमालाची खरेदी-विक्रीच बंद झाल्याने शेतकरी व व्यापा:यांमध्ये उसनवारीचा होणारा हा व्यवहारही बंद झाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. एकीकडे शेतमाल साठवून ठेवल्याने त्याची प्रतवारी कमी होत आहे तर दुसरीकडे बाजार समितीचे व्यवहार बंद असल्याने मालाची विक्री होत नाही अशा दुहेरी संकटात शेतकरी सापडला आहे. शेतक:यांच्या हातात पैसा नसल्याने तालुक्यातील संपूर्ण आर्थिक घडीच विस्कटली आहे. मार्केटमध्ये मंदीचे सावट पसरले आहे.आर्थिक देवाण-घेवाण थांबल्याने बँकांचे व्यवहार थंडावले आहेत. एकंदरीतच बाजार समितीच्या बंदने संपूर्ण तालुक्याची आर्थिक नाडी आवळली गेली असून, केवळ शेतकरी व व्यापारीच नव्हे तर हमाल, मापाडी, धान्य वाहतूकदार, इतर व्यावसायिक सारेच आर्थिक अडचणीत आले आहेत.