शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

शहाद्यात साडेतीन लाखांचे मद्य जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2017 00:55 IST

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : खेतिया येथून बेकायदेशीररित्या गुजरात राज्यातील उधना, जि.सुरत येथे मद्याची वाहतूक करणाºया दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने रंगेहाथ पकडले.  त्यांच्याकडून तीन लाख रुपये किमतीच्या जीपसह ६६ हजार ५०० रुपये किमतीचे विदेशी मद्य असा एकूण तीन ६६ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. या दोघा आरोपींना ...

ठळक मुद्दे जीपसह मद्यसाठ्याचा समावेशखेतियाहून होणार होती वाहतूक

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : खेतिया येथून बेकायदेशीररित्या गुजरात राज्यातील उधना, जि.सुरत येथे मद्याची वाहतूक करणाºया दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने रंगेहाथ पकडले.  त्यांच्याकडून तीन लाख रुपये किमतीच्या जीपसह ६६ हजार ५०० रुपये किमतीचे विदेशी मद्य असा एकूण तीन ६६ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. या दोघा आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना १६ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. याबाबत असे की, खेतिया येथून गुजरात राज्यात मद्याची तस्करी केली जाणार असल्याची गुप्त वार्ता मिळाल्यानंतर येथील डोंगरगाव रस्त्यावरील पेट्रोल पंपानजीकच्या चौफुलीवर स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे निरीक्षक गिरीश पाटील, हवालदार विलास अजगे, भटू धनगर यांच्या पथकाने सापळा रचून मध्यरात्रीच्या सुमारास पांढºया रंगाची जीप क्रमांक जीजे ५ - सीएम ६४१४ हिला मिळालेल्या माहितीनुसार पथकाने अडविण्याचा प्रयत्न केला असता चालकाने याकडे दुर्लक्ष करीत गाडीचा वेग वाढवत पुढे नेली. या वेळी सिनेस्टाईलने गाडीचा पाठलाग करून पोलिसांनी गाडीला अडवून चौकशी केला असता त्यात ६६ हजार ५०० रुपये किमतीचे बॉम्बे स्पेशल विस्कीचे बॉक्स आढळून आले.याबाबत शहादा पोलिसात हवालदार विकास अजगे यांच्या फिर्यादीवरून कैलास जनार्दन कोळी (२३) रा.उधना व विराज राजू खंडारे (२१) रा.उधना जि.सुरत या दोघांना अटक केली असून, त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.दरम्यान, मध्य प्रदेशतून गुजरात राज्यात मद्याची तस्करी होत असल्याच्या अनेक घटना उघडकीस आल्या असून, देखील राज्य उत्पादन शुल्क विभागाने याकडे गांभीर्याने घेतल्याचे दिसून येत नाही. परिणामी दररोज लाखो लीटर बनावट मद्याची तस्करी शहादा तालुक्यातून होत असते. या तस्करीला व तस्करांचा कायमस्वरूपी मुसक्या आवळण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.