शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
3
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
4
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
5
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
6
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
7
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
8
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
9
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
10
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
11
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
12
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
13
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
14
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
15
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
16
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
17
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
18
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
19
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
20
Kareena Kapoor : "मी २ महिने शाहिदच्या मागे लागलेली, खूप सारे SMS करायची, मी पहिली व्यक्ती होती, जी..."

शहाद्यात साडेतीन लाखांचे मद्य जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2017 11:41 IST

एलसीबीची कारवाई : जीपसह मद्यसाठाचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : खेतिया येथून बेकायदेशिररित्या गुजरात राज्यातील उधना, जि.सुरत येथे मद्याची वाहतूक करणा:या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने रंगेहाथ पकडले.  त्यांच्याकडून तीन लाख रुपये किमतीच्या जीपसह 66 हजार 500 रुपये किमतीची विदेशी मद्य असा एकूण तीन 66 हजार 500 रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.या दोघा आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना 16 ऑगस्टर्पयत पोलीस कोठडी सुनावली आहे. याबाबत असे की, खेतिया येथून गुजरात राज्यात मद्याची तस्करी केली जाणार असल्याची गुप्तवार्ता मिळाल्यानंतर येथील डोंगरगाव रस्त्यावरील पेट्रोल पंपानजीकच्या चौफुलीवर स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे निरीक्षक गिरीष पाटील, हवालदार विलास अजगे, भटू धनगर यांच्या पथकाने सापळा रचून मध्यरात्रीच्या सुमारास पांढ:या रंगाची जीप क्रमांक जीजे 5 - सीएम 6414 हिला मिळालेल्या माहितीनुसार पथकाने अडविण्याचा प्रय} केला असता चालकाने याकडे दुर्लक्ष करीत गाडीचा वेग वाढवत पुढे नेली. या वेळी सिनेस्टाईलने गाडीचा पाठलाग करून पोलिसांनी गाडीला अडवून चौकशी केला असता त्यात 66 हजार 500 रुपये किमतीचे बॉम्बे स्पेशल विस्कीचे बॉक्स आढळून आले.याबाबत शहादा पोलिसात हवालदार विकास अजगे यांच्या फिर्यादीवरून कैलास जनार्दन कोळी (23) रा.उधना व विराज राजू खंडारे (21) रा.उधना जि.सुरत या दोघांना अटक केली असून, त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.दरम्यान, मध्यप्रदेशतून गुजरात राज्यात मद्याची तस्करी होत असल्याच्या अनेक घटना उघडकीस आल्या असून, देखील राज्य उत्पादन शुल्क विभागाने याकडे गांभीर्याने घेतल्याचे दिसून येत नाही. परिणामी दररोज लाखो लिटर बनावट मद्याची तस्करी शहादा तालुक्यातून होत असते. या तस्करीला व तस्करांचा कायम स्वरूपी मुसक्या आवळण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.