शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

शहाद्यात पर्यायी रस्त्याच्या दुरवस्थेने अपघात वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2018 13:04 IST

शहाद्यात वाहनधारक त्रस्त : भेंडवा नाल्याचे काम महिनाभरापासून बंद

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 27 : शहराजवळील दोंडाईचा रस्त्यावर भेंडवा नाल्यावर पुलाचे बांधकाम सुरू आहे. या कामासाठी बनविण्यात आलेल्या पर्यायी रस्त्यावर खड्डे पडल्याने दररोज अपघात होत आहे. रस्त्यावरील खडी वर आल्याने मोठय़ा वाहनाच्या टायरखाली खडी येऊन ती उधळून पादचारी व दुचाकीस्वार जखमी झाल्याच्या घटनाही वाढल्या आहेत. दरम्यान, या पुलाचे काम महिनाभरापासून बंद असून पावसाळ्याआधी हे काम पूर्ण झाले नाही तर अनेक समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे.केंद्र शासनाच्या रस्ते विभागाकडून विसरवाडी ते सेंधवा महामार्गादरम्यान कोळदा ते  खेतिया दरम्यान रस्ता दुपदरीकरणाचे काम वेगात सुरू आहे. या रस्त्यादरम्यान शहादा शहराजवळ दोंडाईचा रस्त्यावर भेंडवा नाला येतो. या नाल्यावर दोन ठिकाणी पुलाचे बांधकाम करण्यात येत आहे. या कामामुळे खडी-मुरुम टाकून          तात्पुरता पर्यायी रस्ता तयार           करण्यात आला आहे. मात्र या रस्त्यावरुन दररोज शेकडो अवजड वाहने ये-जा करीत असल्याने पर्यायी रस्त्यावर एक ते दीड फुटाचे खड्डे          पडले आहेत. या खडय़ांमधून          अवजड वाहन काढताना चालकांना कसरत करावी लागते. अनेकवेळा अपघातही होत आहेत. दुचाकींचे अपघात तर नित्याचीच बाब झाली असून अनेकजण जखमी झाले         आहेत. हा पर्यायी रस्ता खडीचा असल्याने वाहनांच्या कायमच्या वर्दळीमुळे खडी रस्त्याच्यावर आली आहे. ही खडी मोठय़ा वाहनाच्या टायरखाली येऊन पादचारी व दुचाकीस्वार जखमी होण्याच्या घटनाही वाढत आहेत. सध्या तापमानात दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यातच अवजड वाहनांच्या ये-जामुळे रस्त्यावर धूळ उडते. या धुळीचा त्रासही दुचाकीस्वावर व रस्त्याच्या बाजूला असलेल्या व्यावसायिकांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे भेंडवा नाल्यावरील दोन्ही पुलांच्या कामाला गती देऊन ते लवकर पूर्ण करण्याची मागणी होत आहे.