शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

शहादा तालुका ग्रा़पं पोटनिवडणूकीसाठी उमेदवार मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 13:11 IST

अनुत्साह : शहादा तालुक्यात केवळ तीन अर्ज दाखल

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 15 : तालुक्यातील ग्रामपंचायत पोटनिवडणूक कार्यक्रम जाहिर झाला होता़ यानुसार 18 ग्रामपंचायतीच्या 20 जागांसाठी अर्ज मागण्यात आले होत़े मात्र 12 मे अंतिम मुदतीअखेर केवळ दोन ग्रामपंचायतीच्या दोन जागांसाठी तीन अर्ज आले असून 17 ठिकाणी पुन्हा निवडणूक घेण्याची वेळ येणार आह़े शहादा तालुक्यातील रिक्त ग्रामपंचायत सदस्य पदासाठी निवडणूक आयोगाने चौथ्यांदा अधिसूचना काढली होती़ यानुसार आचारसंहिता लागू झाली होती़ पाडळदा बुद्रुक, कमरावद, बिलाडी त़सा, बुपकरी, श्रीखेड, भोरखेडा, दामळदा, मलोणी, कुढावद, सावळदा, कु:हावद त़सा, ओझर्टा, परिवर्धे, बुडीगव्हाण, अलखेड, काथर्दे दिगर, शिरूड दिगर व भूते आकसपूर या ग्रामपंचायतींच्या रिक्त पदांसाठी नामनिर्देशन मागवण्यात आली होती़ शनिवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम मुदतीत केवळ भुते आकसपूर येथील 1 जागेसाठी 2 अर्ज तर पाडळदा बुदद्रुक येथे 1 जागेसाठी 1 अर्ज प्राप्त झाला आह़े  बुधवारी अर्ज माघारीचा शेवटचा दिवस आह़े शहादा तालुक्यात ग्रामपंचायत पोटनिवडणूक कार्यक्रम दर सहा महिन्यांनी जाहिर करण्यात येत आह़े यासाठी निवडणूक निर्णय अधिका:यांची नियुक्ती करण्यात आली होती़ मात्र गेल्या सात दिवसात ूकेवळ 2 अर्ज प्राप्त झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आह़ेनंदुरबार जिल्ह्यातील 32 ग्रामपंचायतींच्या 36 जागांसाठीचा पोटनिवडणूक कार्यक्रम जाहिर झाला होता़ यापैकी शनिवारी अंतिम मुदतीत शहादा तालुक्यातील पाडळदा बुद्रुक आणि भूतेआकसपूर, नवापूर तालुक्यातील ढोंग 1, नागगीपाडा 2, तळोदा तालुक्यातील सोमावल खुर्द 1, नंदुरबार तालुक्यातील भोणे 2, वाघशेपा 2, कोठडा 1, धिरजगाव 1 तर अक्कलकुवा तालुक्यातील वडीबार ग्रामपंचायतीच्या एका रिक्त पदासाठी केवळ 1 अर्ज दाखल झाला आह़े 32 पैकी केवळ 13 ग्रामपंचायतींतून अर्ज दाखल झाल्याने उर्वरित 23 गावांमधील रिक्त पदासांठी पुन्हा अधिसूचना काढण्यात येईल़ येत्या सप्टेंबर महिन्यात यातील काही ग्रामपंचायतींची मुदत संपणार आह़े