शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

शहादा पालिका नगरसेवकांच्या अपात्रतेबाबतची सुनावणी पुढे ढकलली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 12:24 IST

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : खोटे व बनावट जातवैधता प्रमाणपत्र सादर केल्याप्रकरणी दोन तर दोनपेक्षा अधिक अपत्य असल्याप्रकरणी एक अशा तीन नगरसेवकांच्या विरोधात जिल्हाधिका:यांकडे अपात्रतेची तक्रार दाखल झाल्याने शहाद्याच्या या तिन्ही नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे. या तक्रारींवर गुरुवारी होणारी सुनावणी पुढे ढकलल्याने याप्रकरणी काय निर्णय लागतो याकडे लक्ष लागले आहे.शहादा ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : खोटे व बनावट जातवैधता प्रमाणपत्र सादर केल्याप्रकरणी दोन तर दोनपेक्षा अधिक अपत्य असल्याप्रकरणी एक अशा तीन नगरसेवकांच्या विरोधात जिल्हाधिका:यांकडे अपात्रतेची तक्रार दाखल झाल्याने शहाद्याच्या या तिन्ही नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे. या तक्रारींवर गुरुवारी होणारी सुनावणी पुढे ढकलल्याने याप्रकरणी काय निर्णय लागतो याकडे लक्ष लागले आहे.शहादा नगरपालिकेची मागीलवर्षी निवडणूक झाली होती. नगराध्यक्षपदी भाजपचे मोतीलाल पाटील विजयी झाले होते तर काँग्रेसचे 11, भाजपचे 10, एमआयएमचे चार आणि राष्ट्रवादी व अपक्ष प्रत्येकी एक याप्रमाणे संख्याबळ होते. निवडणुकीच्या एक वर्षानंतर तीन सदस्यांविरोधात जिल्हाधिका:यांकडे तक्रार दाखल करण्यात आल्याने पालिका वतरुळात खळबळ उडाली आहे. एमआयएमचे नगरसेवक वाहीद रशीद पिंजारी यांच्याविरोधात माजी नगरसेवक शेख मेहमूद शेख अहेमद यांनी तर भाजपच्या नगरसेविका सईदा साजीद अन्सारी यांच्याविरोधात माजी नगराध्यक्ष विजय पाटील यांनी जिल्हाधिका:यांकडे तक्रारी केल्या आहेत. दोघाही नगरसेवकांवर खोटे व बनावट जातवैधता प्रमाणपत्र सादर केल्याची तक्रार आहे तर नगरसेवक मकरंद पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे एकमेव नगरसेवक शेख इकबाल शेख सलीम यांना दोनपेक्षा अधिक अपत्य असल्याने त्यांचे नगरसेवकपद रद्द करण्याची मागणी जिल्हाधिका:यांकडे केली आहे. एमआयएम, राष्ट्रवादी काँग्रेस आणि सत्ताधारी भाजपच्या तिघाही नगरसेवकांविरोधात अपात्रतेच्या तक्रारी दाखल झाल्याने पालिका वतरुळात खळबळ उडाली आहे. दरम्यान, याप्रकरणी गुरुवारी जिल्हाधिका:यांकडे सुनावणी होणार होती. परंतु जिल्हाधिकारी बाहेरगावी असल्याने सुनावणी होऊ शकली नाही. नगरसेवक अपात्रतेप्रकरणी काय निर्णय होतो याकडे शहादेकरांचे लक्ष लागून आहे.