शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
4
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
5
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
6
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
7
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
8
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
9
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
10
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
11
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
12
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
13
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
14
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
15
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
16
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
17
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
18
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
19
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...

शहादा कृउबाससाठी 49 हजार मतदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 13:16 IST

15 जागांसाठी चुरस : शेतक:यांचा प्रथमच मतदानात होणार सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक प्रक्रिया राबवण्यात येणार आह़े यंदा 15 जागांसाठी होणा:या या निवडणुकीत 49 हजार 255 मतदार सहभागी होऊन मतदानाचा हक्क बजावणार आहेत़ शहादा, अक्कलकुवा, धडगाव, नंदुरबार व तळोदा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका शासनाच्या नव्या नियमानुसार होणार आहेत़ यासाठीचे आरक्षण जाहीर झाले आह़े यामुळे विविध कार्यकारी संस्था व खुल्या जागांसाठी इच्छुक तयारी करत आहेत़ शहादा बाजार समितीत 10 जागा सर्वसाधारण खुल्या प्रवर्गासाठी राखीव तर पाच जागा ह्या विविध जातीय आरक्षणांतर्गत राखीव आहेत़ तालुक्यात विविध कार्यकारी संस्थांच्या जागा यंदा वाढल्याने बाजार समिती ताब्यात घेण्याचा मार्ग विकासोतून जाणार आह़े त्यामुळे या संस्था ताब्यात असलेल्या नेत्यांकडून शहादा तालुक्यात मोर्चेबांधणी सुरू झाली आह़े शासनाने यंदा काढलेल्या आदेशानुसार बाजार समिती किंवा तत्सम विविध कार्यकारी संस्था आणि आदिवासी विविध कार्यकारी संस्थांचे सभासद शेतकरी बाजार समितीच्या निवडणुकीवेळी मतदान करू शकणार आहेत़ शहादा बाजार समितीत खुला प्रवर्ग, अनुसूचित जाती-जमाती, भटके विमुक्त यासाठी प्रत्येकी 1, महिला राखीव 2 तर 10 जागा ह्या सर्वसाधारण गटासाठी आहेत़ मोहिदा तर्फे शहादा या सर्वसाधारण गणात 7 गावांचा समावेश करण्यात आला आह़े यातील 3 हजार 200 मतदार आहेत़ कहाटूळ या इतर मागासवर्गीय जागेसाठी 10 गावांचे 3 हजार 370 मतदार, कोंढावळ सर्वसाधारण जागेसाठी 11 गावांचे 3 हजार 245, वडाळी सर्वसाधारण जागेसाठी 8 गावे समाविष्ट असून येथे  3 हजार 252 मतदार आहेत़ कळंबू  सर्वसाधारण जागेसाठी 5 गावांचे 3 हजार 324, अनुसूचित जाती राखीव जागा असलेल्या शिरूड गणात 14 गावांचा समावेश आह़े येथील मतदार संख्या 3 हजार 358 एवढी आह़े भटके विमुक्त प्रवर्गासाठी राखीव प्रकाशा गणात 5 गावांचे 3 हजार 351 सभासद मतदार मतदान करतील़तालुका बाजार समितीच्या गतवेळी झालेल्या निवडणुकीत 11 जागा ह्या विविध कार्यकारी संस्था आणि चार जागा ह्या पंचायत समितीच्या माध्यमातून निवडून आणल्या गेल्या होत्या़ यासाठी केवळ 2 हजार 416 मतदार होत़े पाच वर्षात राज्यात सत्तेवर आलेल्या भाजप-शिवसेना युतीच्या शासनाच्या नवीन नियमांची बांधणी करून बाजार समितीच्या निवडणुकीत शेतक:यांना प्रतिनिधित्व मिळवून देण्याचा निर्णय घेतला आह़ेनवीन निर्णयानुसार यंदा 49 हजार शेतकरी मतदानासाठी तयार झाले शहादा तालुक्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि विधानसभा, लोकसभा निवडणुकांच्यापूर्वी होणा:या या निवडणूक प्रक्रियेतून राजकीय पक्षांची नेमकी तयारीही दिसून येणार आह़े यामुळे या निवडणुकांना राजकीय पक्ष काळजीपूर्वक हाताळत असल्याचे चित्र आह़े येत्या काही दिवसात उमेदवार निवडीपासून ते ग्रामस्तरावर बैठकांर्पयत कार्यक्रम सुरू होणार आह़े यातही प्रत्यक्ष निवडणूक प्रचार करण्यासाठी उमेदवार हे शेतक:यांच्या घरांर्प्यत जाणार असल्याने पहिल्यांदाच बाजार समिती तळागाळार्पयत पोहोचण्याची आशा व्यक्त करण्यात येत आह़े बाजार समितीत मतदान करण्यास मिळत असल्याने तालुक्यातील शेतकरीही उत्साहात आहेत़ यापूर्वी केवळ गावनिहाय पदाधिका:यांची निवडणूक झाल्यानंतर कळत होती़ यंदा मात्र मतदानाची संधी मिळाल्याने शेतक:यांमध्ये चर्चा रंगली आह़े