शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

मारहाण करणाऱ्या तिघांना शहादा न्यायालयाकडून कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2019 11:37 IST

शहादा न्यायालय : कोंढावळ येथे घडली होती घटना

नंदुरबार : शेतीच्या वादातून मारहाण करणाºया कोंढावळ येथील दोघांना शहादा न्यायालयाने तीन वर्ष कारावास व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.२६ जून २०१४ रोजी ही घटना घडली होती. सरलाबाई आत्माराम शेवाळे हे आपले पती आत्माराम शेवाळे यांच्यासह त्यांच्या कोंढावळ शिवारातील शेतातून जात होते. त्यावेळी रवींद्र हिलाल माळी, हिलाल बाजीराव माळी यांनी शेतातून जाण्यावरून वाद घातला. शिविगाळ केली. घरी आल्यावर दोघांनी लाकडी दांडक्याने आत्माराम शेवाळे यांच्यावर वार केला. तसेच हाताबुक्यांनी बेदम मारहाण केली. मारहाणीत ते बेशुद्ध पडले. त्यांच्या नाकातोंडातून रक्त येवू लागल्याने त्यांना तातडीनने अर्जून माळी, राजाराम माळी, आसाराम माळी यांनी अ‍ॅपेरिक्षाने वडाळी, ता.शहादा आरोग्य केंद्रात दाखल केले. तेथून शहादा येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले. याबाबत सरलाबाई आत्माराम शेवाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रवींद्र व हिलाल माळी यांच्याविरुद्ध सारंगखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सहायक पोलीस निरिक्षक विनोद पाटील यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. अतिरिक्त सत्र न्यायाधिश पी.बी.नायकवाड यांच्यापुढे हा खटला चालला. न्यायालयाने रवींद्र हिलाल माळी व हिलाल बाजीराव माळी यांना दोषी धरत तीन वर्ष कारावास व दहा हजाराचा दंडाची शिक्षा सुनावली तर इतर दोघा संशयीतांना निर्दोष सोडले. सरकारी पक्षातर्फे अ‍ॅड.स्वर्णसिंह गिरासे यांनी काम पाहिले. पैरवी अधिकारी म्हणून जमादार महेंद्र सोनवणे होते.