शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

शहाद्यात मिरवणुकीच्या वादातून मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2018 12:49 IST

शहाद्यातील घटना : पाच जणांवर गुन्हा दाखल

नंदुरबार :  विसजर्न मिरवणुकीत गणेश मंडळ पुढे नेण्याच्या वादातून पाच जणांनी एकास बेदम मारहाण केल्याची घटना शहादा येथील गांधी पुतळ्याजवळ घडली. याप्रकरणी मारहाण व अॅट्रोसिटीअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहाद्यात विसजर्न मिरवणुका सुरू असतांना काही मंडळे गांधी पुतळ्याजवळ आली. तेथे कार्तिक दिलीप नाईक व दिलीप रामदास चौधरी यांच्या मंडळात मिरवणूक पुढे नेण्यावरून वाद झाला. चौधरी यांनी आमच्या मंडळाला पुढे जावू द्या म्हणून सांगितले, परंतु नाईक यांनी लाईननुसारच मंडळाच्या मिरवणुका पुढे जातील असे बजावले. त्यावरून दोघा मंडळाच्या कार्यकत्र्यामध्ये वाद झाला. वादाचे पर्यावसान मारहाणीत झाले. कार्तिक दिलीप नाईक यांच्या फिर्यादीनुसार दिलीप रामदास चौधरी, प्रकाश रामदास चौधरी, हितेंद्र दिलीप चौधरी, महेंद्र दिलीप चौधरी, मनोज चौधरी सर्व रा.शहादा यांनी कार्तिक नाईक यांना बेदम मारहाण करून जातीवाचक शिविगाळ केली. याबाबत शहादा पोलिसात पाचही जणांविरुद्ध मारहाण व अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास उपविभागीय पोलीस अधिकारी महारू पाटील करीत आहे.  शहाद्यात पाचव्या, सातव्या, नवव्या व अकराव्या दिवशी गणेश विसजर्न मिरवणुका काढण्यात आल्या. सर्वत्र शांततेत व उत्साहात या मिरवणुका निघाल्या, परंतु या किरकोळ कारणावरून यंदा गणेशोत्सवातील एकमेव गुन्हा दाखल होण्याचे कारण शहाद्यात घडले. पोलिसांचे नियोजन चांगले राहिले.