शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी आरोपीस सात वर्ष सक्तमजुरीची शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2017 11:34 IST

आरोपी होता पुजारी : पोक्सोअंतर्गत पहिलाच निकाल

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार करणा:या पुजा:यास पोक्सो कायद्याअंतर्गत सात वर्ष सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने ठोठावली. दरम्यान, पोक्सो कायद्याअंतर्गत प्रथमच अशी शिक्षा ठोठावण्यात आली आहे.याबाबतची माहिती अशी, सुंदरदे ता.नंदुरबार येथील मंदीरातील पुजारी कनवर रुपल्या गावीत उर्फ कन्हैया महाराज याने 18 जुलै 2016 रोजी सकाळी शाळेत जाणा:या 13 वर्षीय बालिकेला जबरीने मोटरसायकलीवर बसवून तिचे अपहरण केले. यासंदर्भात बालिकेच्या वडिलांनी उपनगर पोलिसात गुन्हा देखील दाखल केला होता. कन्हैया महाराज याने मुलीला देवमोगरा येथे नेवून तिच्यावर अत्याचार केला तसेच चौथ्या दिवशी प्रकाशा येथे नेले. तेथे त्याला व मुलीला ओळखीच्या व्यक्तीने पाहून आरडाओरड केली व लोकांच्या मदतीने त्याला पकडून प्रकाशा पोलीस दूरक्षेत्रात जमा केले. त्यानंतर मुलीच्या माहितीवरून महाराजाविरुद्ध वाढीव पोस्को कलम लावण्यात आले. पोलीस उपनिरिक्षक बी.एम.केदार यांनी या गुन्ह्याचा तपास केला. न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. महाराजाला पोलिसांनी ताब्यात घेतल्यापासून तो अटकेतच होता. जिल्हा सत्र न्यायालयात सरकार पक्षातर्फे 13 साक्षीदार तपासण्यात आले. शाळेचे मुख्याध्यापक जगन्नाथ पाटील यांचीही साक्ष तपासण्यात आली. सर्व साक्षी आणि इतर बाबी तपासून न्या.अभय वाघवासे यांनी कनवर गावीत उर्फ कन्हैया महाराज यांना पोक्सो कायद्याखाली सात वर्ष सक्त मजुरी व पाच हजार रुपये दंड, भादंवि कलम 363 अन्वये तीन वर्ष सक्तमजुरी व तीन हजार रुपये दंड तसेच कलम 376 अन्वये सात वर्ष सक्त मजुरी व पाच हजार रुपये दंड ठोठावण्यात आला. याकामी सरकारपक्षातर्फे जिल्हा सरकारी वकिल अॅड.निलेश देसाई यांनी काम पाहिले.