शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
4
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
5
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
6
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
7
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
8
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
9
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
10
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
11
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
12
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
13
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
14
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
15
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
18
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
19
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
20
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
Daily Top 2Weekly Top 5

सात हजार गणेशमूर्तीची निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2019 11:45 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : स्वामी समर्थ केंद्रातर्फे एकाच वेळी सात हजार बालकांनी सात हजार मातीच्या गणपती मूर्ती तयार ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : स्वामी समर्थ केंद्रातर्फे एकाच वेळी सात हजार बालकांनी सात हजार मातीच्या गणपती मूर्ती तयार केल्या. जिल्ह्यात अशा प्रकारचा हा पहिलाच उपक्रम होता. अखिल भारतीय स्वामी समर्थ गुरुपीठ क्षेत्र त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक, बालसंस्कार व युवा संस्कार केंद्र यांच्या वतीने रविवारी नंदुरबार येथे आगळा वेगळा असा समाज उपयोगी उपक्रम राबविण्यात आला. सर्वकडे पर्यावणाचा :हास होत असताना पर्यावरण वाचवण्यासाठी  स्वामी समर्थ केंद्रातर्फे  घेण्यात आलेला हा उपक्रम उल्लेखनीय आहे .बाजार समिती आवारात जवळपास जिल्हाभरातून सात हजार विद्याथ्र्यानी सहभागी होऊन एकाच वेळी मातीचा गणपती बनवण्याचा उपक्रम केला. या कार्यक्रमाला प्रमुख म्हणून अखिल भारतीय स्वामी समर्थ संचलित बाल संस्कार व युवा संस्कार केंद्राचे  प्रमुख नितीन मोरे उपस्थित होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून खासदार डॉ. हीना गावित, आमदार डॉ. विजयकुमार गावित आमदार चंद्रकांत रघुवंशी, नगराध्यक्ष र}ा रघुवंशी, भाजपाचे जिल्हा अध्यक्ष विजय चौधरी, जेष्ठ नेते हिरालाल चौधरी, जिल्हा पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित, माजी जि.प. सभापती अहिल्याबाई पावरा, गट शीक्षणाधिकारी डॉ. राहुल चौधरी,पत्रकार संघाचे अध्यक्ष योगेंद्र दोरकर, हिरालाल चौधरी, प्रशासन अधिकारी आर. बी. पाटील, शिक्षण विस्तार अधिकारी एस. एन.पाटील व मान्यवर उपस्थित होते.प्रगती करताना  भारतीय संस्कृती टिकवणं तेवढंच महत्वाच आहे. कारण संस्कृती टिकली तरच धर्म टिकत असतो, प्रगती करत असताना बालकांना प्राचीन गोष्टीची ओळख करून देणे फार महत्वाचे आहे. कारण प्राचीन गोष्टींची ओळख होत असताना पर्यावरणाची ओळख देखील होत असते. विद्याथ्र्याना विद्यार्थी दशेतच जर पर्यावरणाची जाणीव झाली तर भविष्यात कोणत्याच प्रकारचे नुकसान होणार नाही म्हणून सर्व सण साजरे करताना पर्यावरण पूर्वक साजरे करायला हवे. बाल संस्कार व युवा संस्कार च्या विद्याथ्र्यानी या पर्यावरण पूरक गणेश मूर्तीचा उपक्रमात सहभागी होऊन  नक्कीच एक आदर्श  निर्माण केला. शास्त्रानुसार  दीड दिवसाचा व तो देखील मातीचा गणपती बसविला पाहिजे. जेणे करून धार्मिक भावना टिकून राहतात असे नितीनभाऊ मोरे यांनी यावेळी सांगितले. बनवण्यात आलेल्या या गणपती मुत्र्या जिह्यातील सर्व केंद्रात विक्रीसाठी उपलब्ध करून दिल्या  जाणार आहेत. त्यांच्या विक्रीतून आलेला सर्व पैसा महाराष्ट्रातील  पूरग्रस्तांचा मदतीला  दिला जाणार असल्याची घोषणा यावेळी करण्यात आली. या कार्यक्रमाला जिल्ह्यातील हजारो सेवेकरी उपस्थित होते.

तयार करण्यात आलेल्या गणेशमूर्ती या एकत्र करण्यात आल्या आहेत. त्यांना रंगरंगोटी करून त्या विविध ठिकाणच्या स्वामी समर्थ केंद्रात भाविकांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यातील निधी पुरग्रस्तांना दिला जाणार आहे.