शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सात हजार कुटुंब शौचालयाविना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2017 11:23 IST

तळोदा तालुका : सरपंच, ग्रा.पं. सदस्य, ग्रामसेवक व अंगणवाडी सेविकांची कार्यशाळा

ऑनलाईन लोकमत1 सप्टेंबरतळोदा : तालुक्यातील सात हजार कुटुंबांकडे शौचालये नसल्याची माहिती येथे घेण्यात आलेल्या कार्यशाळेत देण्यात आली. याशिवाय एकूण ग्रामपंचायतींपैकी अजून 27 ग्रामपंचायती शौचालयाविना असून, या ग्रामपंचायती ऑक्टोबर्पयत हगणदरीमुक्त करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. येथील वामनराव बापूजी मंगल कार्यालयात नंदुरबार जिल्हा परिषदेच्या विद्यमाने शौचालयांविषयी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक यांची कार्यशाळा घेण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समितीच्या सभापती शांताबाई पवार होत्या. या वेळी शौचालयाबाबत औरंगाबाद जिल्ह्यातील सरपंच भास्करराव पेरे-पाटील यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, मी गेल्या 35 वर्षापासून आजतागायत गावाचा सरपंच आहे. अन् माझ गावं पापुडा सन 2005 सालापासून हगणदरीमुक्त झाले आहे.सुदृढ आरोग्यासाठी शौचालय अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे गावात सार्वजनिक शौचालये बांधले पाहिजे. आता शासनाचे समाधानकारक अनुदान आहे. शौचालयामुळे गावाच्या विकासात देखील भर पडत असते. माङया गावास विविध बक्षिसातून आतापावेतो दोन कोटी रूपयांचा निधी प्राप्त झाला आहे. या शिवाय ग्रामपंचायतीचा कर भरणा:यास ग्रामपंचायतीकडून वेगवेगळ्या सवलती देखील दिल्या जात असतात. तळोदा तालुक्यातील शौचालयांची आकडेवारी देताना त्यांनी सांगितले की, 2012 नुसार तालुक्यात 25 हजार दारिद्रय़रेषेखालील कुटुंबे आहेत. 51 पैकी 24 ग्रामपंचायती हगणदरीमुक्त झाल्या आहेत. अजूनही 27 ग्रामपंचायती हगणदरीमुक्त करण्याच्या बाकी आहेत. तसेच 18 हजार कुटुंबांकडे वैयक्तीक शौचालये आहेत. अद्याप सात हजार कुटुंबाकडे शौचालये नाहीत. अर्थात बहुसंख्य ग्रामपंचायतींमार्फत शौचालयाची कामे सुरू असली तरी येत्या दोन ऑक्टोबर्पयत संपूर्ण तालुका हगणदरीमुक्त करण्याचे नियोजन करायचे आहे. त्यामुळे शौचालयांसाठी ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामसेवकांनी ठोस प्रय} करण्याचे आवाहन त्यांनी केले.कार्यशाळेचे सूत्रसंचालन विस्तार अधिकारी गुलाबसिंग वसावे यांनी केले. या कार्यशाळेस उपसभापती दीपक मोरे, जिल्हा परिषद सदस्य नरहर ठाकरे, पंचायत समिती सदस्य सिताराम राहसे, अजरुन वळवी, हुपा वसावे, सहायक गटविकास अधिकारी एस.एस. सोनवणे, विस्तार अधिकारी संजय पाटील, सरपंच जयसिंग माळी, दिवाकर पवार, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक व अंगणवाडी सेविका मोठय़ा संख्येने उपस्थित होते.