शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

सातपुडय़ाला लागले होलिकोत्सवाचे ‘वेध’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 13:15 IST

ऑनलाईन लोकमतनंदुरबार, दि़ 22 : सातपुडय़ाला पारंपरिक होलिकोत्सवाचे वेध लागले आहेत़ डाब ता़ अक्कलकुवा (मोरीराही) येथे सोमवारी पहाटे होळी पेटवल्यानंतर जिल्ह्यात होलिकोत्सवाला सुरूवात होणार आह़े होळीच्या पाश्र्वभूमीवर आदिवासी बांधवांमध्ये चैतन्य निर्माण झाले असून बाजारपेठाही सज्ज झाल्या आहेत़  सातपुडय़ाच्या दुर्गम भागातील आदिवासी देवांची भूमी डाब (मोरीराही) येथे पेटणा:या देवहोळीची तयारी सुरू ...

ऑनलाईन लोकमतनंदुरबार, दि़ 22 : सातपुडय़ाला पारंपरिक होलिकोत्सवाचे वेध लागले आहेत़ डाब ता़ अक्कलकुवा (मोरीराही) येथे सोमवारी पहाटे होळी पेटवल्यानंतर जिल्ह्यात होलिकोत्सवाला सुरूवात होणार आह़े होळीच्या पाश्र्वभूमीवर आदिवासी बांधवांमध्ये चैतन्य निर्माण झाले असून बाजारपेठाही सज्ज झाल्या आहेत़  सातपुडय़ाच्या दुर्गम भागातील आदिवासी देवांची भूमी डाब (मोरीराही) येथे पेटणा:या देवहोळीची तयारी सुरू झाली आह़े गुरूवारी सकाळी होळीसाठी लागणारा सर्वात उंच बांबू शोधण्यासाठी डाब येथील 10 युवक रवाना होतील़ पाच दिवस पाळणी व घालून दिलेल्या नियमांचे पालन करून 25 रोजी मध्यरात्री ते बांबू घेऊन येणार आहेत़ डाब येथे पेटलेल्या होळीनंतर सोमवारी डाब गावातील होळी पेटवण्यात येईल़ त्यानंतर धडगाव, अक्कलकुवा तालुक्याच्या विविध भागात होळी पेटवण्यात येणार आह़े होळीच्या पाश्र्वभूमीवर दागिने, घुंगरू आणि इतर साहित्याची मोठी विक्री होत असत़े यासाठी कारागिर धडगाव परिसरात दाखल झाले आहेत़  त्यांच्याकडून होणा:या खरेदीमुळे बाजारात उलाढालीलाही सुरूवात झाली आह़े डाब (मोरीराही) येथील होळी ही देवाने ठरवून दिलेली पहिली होळी अशी धारणा आदिवासी बांधवांमध्ये आह़े या होळीसाठी सातपुडय़ाच्या दुर्गम भागातील नागरिक डाब येथे रविवारपासून दाखल होणार आहेत़ याहामोगी देवीचे जन्मठिकाण असलेल्या देवगाई येथे दर्शनासाठी भाविकांची गर्दी होत असत़े  डाबच्या देवहोळीनंतर वालंबा, तोडीकुंड, काठी यासह ठिकठिकाणी होळी पेटणार आह़े यात जागोजागी मोरखी, बुध्या, बावा, धानका, डोखा हे गेर नृत्य आदिवासींकडून केले जाणार आह़े सातपुडय़ात होलिकोत्सवाला आठवडा शिल्लक असल्याने मोलगी, अक्कलकुवा, धडगाव, तळोदा, तोरणमाळ येथील बाजारात गर्दी वाढत आह़े होळी पेटल्यानंतर त्या-त्याठिकाणी मेलादे होणार आहेत़ होळीपूर्वी भोंग:या बाजाराचे आयोजन करण्यात येणार असल्याने धडगाव व अक्कलकुवा तालुक्यात सध्या ग्रामपंचायतींच्या नियोजन बैठका सुरू आहेत़ मोलगी, धडगाव, अक्कलकुवा आणि म्हसावद पोलीस ठाण्याकडूनही भोंग:या बाजार व होळीसाठी पोलीस बंदोबस्ताचे नियोजन सुरू आह़े