शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

तिघा बाधितांच्या संपर्कात आले सातजण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2020 12:37 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्हा रुग्णालयाच्या आयसोलेशन वॉर्डात दाखल चौघा कोरोनाबाधितांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर वैद्यकीय पथक नजर ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्हा रुग्णालयाच्या आयसोलेशन वॉर्डात दाखल चौघा कोरोनाबाधितांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर वैद्यकीय पथक नजर ठेवून आहे़ दरम्यान मंगळवारी अहवाल आलेल्या तिघांच्या संपर्कात सात जण आले होते़ या सर्वांचा प्रशासनाने शोध घेत त्यांना क्वारंटाईन केले आहे़प्रभाग क्रमांक १० मधील ४८ वर्षीय पुरुषाला कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्यांची तपासणी करुन त्यांचे नमुने धुळे येथील वैद्यकीय महाविद्यालयाच्या लॅबमध्ये तपासणी करण्यासाठी देण्यात आले होते़ पहिल्या दिवशी १९ जणांचे नमुने निगेटिव्ह आल्यानंतर प्रशासनाला दिलासा मिळाला होता़ परंतू सोमवारी बाधिताची आई, मुलगा आणि मुलगी यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आल्यानंतर खळबळ उडाली होती़ चौघांना आयसोलेश वॉर्डात दाखल केल्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले आहेत़ मंगळवारी या चौघांच्या नियमित तपासण्या करण्यात आल्या आहेत़ तपासणीनंतर त्यांचे नमुने पुन्हा धुळे येथे पाठवण्यात येणार असल्याची माहिती आहे़ बाधित असलेल्या तिघांच्या संपर्कात आलेल्यांचा मंगळवारी सकाळपासून शोध घेण्यात येत होता़प्रभाग १० मधील नव्याने समोर आलेल्या तिघांच्या संपर्कात सात जण आल्याची माहिती तालुका प्रशासनाला मिळाल्यानंतर त्यांना तातडीने क्वारंटाईन करुन त्यांचे नमुने संकलित करण्यात आले आहे़ या नमुन्यांची तपासणी सध्या सुरु असून त्याचा अहवाल अद्याप यायचा आहे़ सातही जणांमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे नसल्याची माहिती आहे़ दरम्यान नगरपालिकेकडून या भागात निर्जंतुकीकरण करण्यावर भर देण्यात येत आहे़ संपर्कात आलेल्या सात लोंकांची हिस्ट्रीही तपासण्यात येत असल्याचे सांगण्यात आले आहे़