शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

सातपुडय़ात भरली ‘बारमेग’ जत्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2018 12:33 IST

असली येथे उपक्रम : पारंपरिक बी-बियाण्यांसह वनभाज्यांची बियाणे विक्री

लोकमत न्यूज नेटवर्कधडगाव : तालुक्यातील असली येथे 10 वर्षाच्या खंडानंतर खरीप हंगामात शेतक:यांना मार्गदर्शन करणारी पारंपरिक बारमेघ जत्रा भरवण्यात आली होती़ या खरीप जत्रेत पारंपरिक बी-बियाण्यांसह, वनभाज्या, शेती साहित्य यांची खरेदी विक्री करण्यात आली़ या वेळी पारंपरिक शेती टिकवून ठेवण्यासाठी चर्चाही करण्यात आली़ सातपुडय़ाच्या दुर्गम व अति दुर्गम भागात पारंपरिक शेतीमूल्य जपणारे आदिवासी बांधव वर्षानुवर्षे चालत असलेल्या पद्धतीनुसार शेती करून उत्पन्न मिळवण्यास कायम प्राधान्य देत आहेत़ परंपरेने चालत आलेल्या शेतीचा :हास होऊ नये यासाठी धडगाव तालुक्याच्या अति दुर्गम भागात गेल्या अनेक वर्षापासून खरीप हंगामाला साहाय्यकारी ठरणारी ‘बारमेग जातरें’ अर्थात बारमाही यात्रा भरवण्यात येत़े गेल्या काही वर्षात या यात्रेच्या आयोजनात खंड पडला होता़ परंतु यंदाच्या वर्षात पुन्हा नव्याने ही यात्रा घेण्यात आली़ मागच्या पिढीकडून येणा:या पिढीला पारंपरिक शेती पद्धत समजावून सांगण्यासाठी 28 व 29 मे या दोन दिवसात झालेल्या यात्रोत्सवात नामशेष होत असलेल्या पारंपरिक बी-बियाण्याची साठवण, पेरणी आणि संवर्धनाबाबत चर्चा करण्यात आली़ तसेच जल जंगल आणि जमीन याबाबत चर्चासत्र घेण्यात आल़े बारमेगचे पूजन करून धनुष्यबाणाने मडके फोडण्याचा अनोखा कार्यक्रम घेण्यात आला़ यात विविध भागातून आलेल्या स्पर्धकांनी सहभाग घेतला़ दोन दिवस रात्री सोंगाडय़ा पार्टीचे कार्यक्रम झाल़े  यात्रोत्सवात आमदार क़ेसी़ पाडवी, माजी सभापती सी़क़े पाडवी, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते कागडा पाडवी यांच्यासह विविध मान्यवरांनी हजेरी लावत शेतक:यांसोबत संवाद साधला़  पारंपरिक शैलीत झालेल्या यात्रोत्सवात वर्षानुवर्षे पेरत असलेल्या बियाण्यांची प्रतवारी, नैसर्गिकदृष्टय़ा त्यांचे महत्त्व यासह वनभाज्यांच्या बियाण्यांची विक्री करण्यात आली होती़ यासोबतच विविध प्रकारच्या पारंपरिक साहित्य बनवून घेत त्याची खरेदी आदिवासी शेतक:यांनी केली़ दोन दिवसात याठिकाणी धडगाव आणि अक्कलकुवा तालुक्यातील शेकडो शेतक:यांनी सहभाग नोंदवला होता़ परिसर यात्रा समिती, सरपंच व ग्रामस्थ असली यांच्याकडून या यात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले होत़े