शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

सातपुडा साखर कारखान्याकडून उसाला 2200 दर निश्चित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2018 12:01 IST

सर्वसाधारण सभा : गेल्यावर्षी गाळप केलेल्या उसाचा भाव

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : गाळप हंगाम 2017-18 साठी जाहीर केलेला ऊस दर एफआरपीपेक्षा अधिक असल्याने शेतकरी व कारखान्याचे हित जोपासण्यासाठी प्रतीटन दोन हजार 200 रुपये दिलेला भाव   देण्यास सर्वानुमते मंजुरी देण्यात आली.साखरेचे भाव खूपच खाली आल्याने साखर कारखान्यांना एफआरपी देणेही शक्य झाले नाही. ऊस गाळप करणे परवडत नसल्याने अनेक कारखान्यांनी हंगाम संपण्यापूर्वीच ऊस गाळप बंद केले होते. मात्र सातपुडा साखर कारखान्याने हंगाम 2017-18 मध्ये कारखाना कार्यक्षेत्रातील संपूर्ण ऊस गाळप केला. सुरुवातीला पहिला हप्ता म्हणून नोंद उसाला 2100 रुपये प्रतीटन अदा केला आहे तर संचालक मंडळाच्या निर्णयानुसार दुसरा हप्ता आणखी प्रतीटन 100 रुपये निधी उपलब्ध झाल्यानंतर अदा करण्यात येणार आहे. तर उर्वरित तिसरा हप्ता प्रतीटन 200 रुपयांप्रमाणे जाहीर केलेला असला तरी कारखान्याचे आर्थिक पत्रकानुसार कारखान्यास जास्तीचा नऊ कोटी रुपये तोटा सहन करावा लागेल म्हणून उर्वरित 200 रुपयांचा तिसरा हप्ता देणे शक्य होणार नसल्याने हंगाम 2017-18 साठी नोंद उसासाठी अंतिम ऊस दर 2200 रुपये प्रतीटन प्रमाणे निश्चित करावा, असा ठराव चेअरमन दीपक पाटील यांनी नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण बैठकीत मांडला होता. त्यास सभासदांनी मंजुरी दिल्याने कारखान्याचा तोटा कमी करता येणे शक्य होणार आहे. एफआरपी दोन हजार 18 रुपये बसत असताना कारखान्याने 182 रुपये जादा देऊन सभासदांचे हित जोपासण्याचा प्रयत्न केला आहे.