शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

नवापूर उपजिल्हा रुग्णालयात सर्वरोगनिदान शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2018 12:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर : राष्ट्रीय आरोग्य मिशनअंतर्गत येथील उपजिल्हा रुग्णालयात  दंत व सर्वरोगनिदान शिबिर घेण्यात आले. शिबिराचे उद्घाटन खासदार डॉ.हीना गावीत यांनी केले. अध्यक्षस्थानी आमदार सुरुपसिंग नाईक होते तर प्रमुख अतिथी म्हणून जि.प. अध्यक्षा रजनी नाईक, आदिवासी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन शिरीष नाईक, नगराध्यक्षा हेमलता पाटील, नगरसेविका सारीका पाटील, बबीता वसावे, ...

लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर : राष्ट्रीय आरोग्य मिशनअंतर्गत येथील उपजिल्हा रुग्णालयात  दंत व सर्वरोगनिदान शिबिर घेण्यात आले. शिबिराचे उद्घाटन खासदार डॉ.हीना गावीत यांनी केले. अध्यक्षस्थानी आमदार सुरुपसिंग नाईक होते तर प्रमुख अतिथी म्हणून जि.प. अध्यक्षा रजनी नाईक, आदिवासी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन शिरीष नाईक, नगराध्यक्षा हेमलता पाटील, नगरसेविका सारीका पाटील, बबीता वसावे, भाजपचे जिल्हा चिटणीस एजाज शेख, तालुकाध्यक्ष प्रदीप वळवी,  शिवसेना तालुका प्रमुख गणेश वडनेरे, जिल्हा दक्षता समिती सदस्य जयंतीलाल अग्रवाल, घनशाम परमार, जाकीर पठाण, समीर दलाल, दिनकर गावीत, कल्पेश अग्रवाल, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.रघुनाथ भोये, डॉ.राजेश वसावे, डॉ.शरद काळे, वैद्यकिय अधिकारी डॉ.अविनाश मावची, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.हरीषचंद्र कोकणी उपस्थित होते.खासदार डॉ.हीना गावीत म्हणाल्या की, असे शिबिर दरवर्षी घेऊन तज्ज्ञ डॉक्टरांना एकत्र करुन सर्व आजारांचे निराकरण झाले पाहिजे. नवापूरसाठी रक्त साठवणुकीचे एकक मंजूर केले असून मंजूर असलेल्या ट्रॉमा केअर सेंटरच्या कामास चालना देण्यात येईल, असे सांगितले. डॉ.रघुनाथ भोये यांनी सिकलसेल आजार व मातृवंदन  योजनेविषयी माहीती देऊन योग्य वयात विवाह करण्याविषयी मार्गदर्शन केले. काया कल्प योजनेअंतर्गत वैद्यकीय अधीक्षक व सर्व कर्मचा:यांनी रुग्णालय स्वच्छ ठेवण्यासाठी खूप परिश्रम घेतल्याने शासनाच्या आरोग्य सेवेतील महत्त्वाचा मानला जाणारा डॉ.आंनदीबाई जोशी पुरस्कार नवापूर उपजिल्हा रुग्णालयाला मिळाला असे गौरवोद्गार त्यांनी काढले. डॉ.राजेश वसावे यांनी सांगितले की, जिल्हाभरात प्रत्येक ग्रामीण रुग्णालयात दंत व सर्वरोगनिदान शिबिराचे आयोजन करण्यात येत असून सर्व प्रकारच्या आजारांविषयी मोफत उपचार रुग्णांना उपब्लध करुन देण्याचा प्रय} होत आहे. तालुका आरोग्य अधिकारी डॉ.हरीषचंद्र कोकणी यांनी कुपोषीत बालकांना प्रत्येक गावातील आशावर्कर यांना दत्तक दिल्याने  कुपोषणाची समस्या दूर होण्यासाठी हातभार लागणार  आहे, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.  सूत्रसंचालन समुपदेशक कैलास माळी यांनी तर आभार वैद्यकीय अधिक्षक डॉ.अविनाश मावची यांनी मानले. शिबिरासाठी डॉ.युवराज पराडके, डॉ.मनिषा वळवी, डॉ.किर्तीलता वसावे, डॉ.प्रमोद कटारीया, डॉ.अमोल वळवी, डॉ.धिरेंद्र चव्हाण, डॉ.महेश मसराम, डॉ.प्रविण चौरे व सहकारी कर्मचा:यांनी परीश्रम घेतले.