लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यात विविध ठिकाणाहून पाच दुचाकी लंपास झाल्याची घटना घडली. त्या त्या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.जिल्ह्यात दुचाकी चोरीच्या प्रमाणात वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसात पाच दुचाकी चोरट्यांनी लंपास केल्या आहेत. जुनवणे, ता.शहादा येथील भाईदास भुता पाटील यांच्या घरासमोरून चोरट्यांनी दुचाकी लांबविली. शहादा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस नाईक वळवी करीत आहे.तिखोरा, ता.शहादा येथील मनोज मणिलाल पाटील यांनी त्यांची दुचाकी अंगणात उभी केली असता रात्रीच्या वेळी चोरट्यांनी ती लांबविली. याबाबत पाटील यांनी शहादा पोलिसात फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल झाला. तपास जमादार सय्यद करीत आहे.नवापूर येथील रमेश रावजी गावीत यांची दुचाकी त्यांच्या घराच्या अंगणातून चोरट्यांनी लंपास केली. ठिकठिकाणी शोध घेतला असता मिळून न आल्याने नवापूर पोलिसात नोंद करण्यात आली आहे. तपास जमादार पवार करीत आहे.तळोदा शहरातील देशपांडे फोटो स्टुडिओ परिसरातून चोरट्यांनी दुचाकी लांबविली. अश्विनभाई मधुसूधन, रा.बाळदा, ता.कुकरमुंडा यांनी याबाबत तळोदा पोलिसात फिर्याद दिली. तपास पोलीस नाईक पाडवी करीत आहे.बामखेडा, ता.शहादा येथील मनोहर विठ्ठल पटेल यांची दुचाकी त्यांच्या घराच्या अंगणातून चोरट्यांनी चोरून नेली. ठिकठिकणी शोध घेतला असता मिळून आली नाही. सारंगखेडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास जमादार बागले करीत आहे. दरम्यान, चोरट्यांचा शोध घेण्याची मागणी होत आहे.
जिल्हाभरातून पाच दुचाकी लंपास झाल्याने खळबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2020 12:09 IST