शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

बोरद शिवारात बिबट्या दिसल्याने खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2019 11:52 IST

महिन्यात तिसरी घटना : वनविभागाकडून उपाय योजना आवश्यक, ग्रामस्थ भयभित

बोरद : बोरद शिवारात पुन्हा एकदा बिबट्याचे दर्शन झाल्याने शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झालेले आहे़ वारंवार अशा प्रकारे बिबट्याचे दर्शन होत असल्याने वनविभागाने याकडे गांभीर्याने पाहण्याचे आवश्यकता आहे़बोरद येथील शेतकरी कृष्णदास काशीनाथ पाटील यांनी आपल्या बोरद शिवारातील सर्वे नं २९० मध्ये टरबूज पिकांची लागवड केली आहे़ या टरबूज पिकाला फवारणी करण्यासाठी पाटील हे सकाळी सात वाजता शेतात पोहचले़ या वेळी कृष्णदास पाटील यांचा मुलगा सागर व तीन शेतमजूर यांनी पिकांवर फवारणी करण्यास सुरुवात करताच समोरुन बिबट्याचे दर्शन झाले़ बिबट्याला पाहताच कृष्णदास पाटील व सोबतच्या सहकाऱ्यांनी जागेवरच शेतीची साहित्या सोडून आपआपल्या घराकडे पळ काढला़ याबाबत संबंधितांनी इतर ग्रामस्थांना घटनेची माहिती दिल्यावर वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाºयांना फोन करुन बोलवण्यात आले़परंतु तोपर्यंत बिबट्याने तेथून पळ काढलेला होता़ या वेळी वनविभागाकडून फटाके फोडण्यात आले परंतु तरीदेखील बिबट्या बाहेर आला नाही़ त्यामुळे ग्रामस्थांकडून अधिकच भिती व्यक्त केली जात आहे़परिसरातील पाण्याचे स्त्रोत आटले असल्याने वारंवार हिंस्त्र प्राणी लोकवस्तीकडे धाव घेत असल्याचे दिसून येत आहे़ नुकतेच मोड शिवारातदेखील बिबट्याचे दर्शन झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती़ त्यातच आता बोरद शिवारात पुन्हा बिबट्याचे दर्शन ग्रामस्थांना झाल्याने ते चिंतेत आहेत़परिसरात बिबट्यांसाठी ट्रॅप कॅमेरे लावावेत तसेच बिबट्याना पकडण्यासाठी पिंजºयाची व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे़ वनविभागाकडून परिसरात फटाके फोडून मिरचीचा धूर करण्यात येणार असल्याच्या उपाय योजना करण्यात येणार आहे़दरम्यान, काही दिवसांपूर्वी हलालपूर गावात बिबट्याकडून धुमाकूळ घालण्यात आला होता़ तळोदा तालूका हा सातपुड्याच्या पायथ्याशी असल्याने परिसरातील अनेक गावांच्या शेतशिवारात बिबट्यासह अन्य हिंस्त्र प्राण्यांचा वावर असल्याचे दिसून येते. साधारणत: ऊस, केळी, यांच्यासारख्या पिकांमध्ये बिबट्या, तरस, अस्वल यांसारखे प्राण्यांच्या अधिवास असल्याचे सातत्याने निदर्शनात आले आहे. उसतोड पूर्ण होऊन अनेक शेते रिकामी झाली असल्याने अधिवास व पाण्याच्या शोधात वन्य प्राणी गावाकडे धाव घेत असल्याचे दिसून येत आहे़ हिंस्त्र प्राण्यांचा वावर वाढल्याने बचावासाठीच्या उपाययोजनाचे प्रशिक्षण शेतकरी व स्थानिक नागरीकांना वनविभागाकडून मिळणे गरजेचे आहे.