शहरं
Join us  
Trending Stories
1
अखेर पाकिस्तानने गुडघे टेकले! आता नवीन अडचणीत सापडला, जल-मंथनसाठी प्रयत्न सुरू
2
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
3
SRH vs KKR : ऑरेंज आर्मीचा मोठा विजय! विदर्भकराची हॅटट्रिक हुकली; पण पठ्ठ्यानं मैफिल लुटली
4
न्यायाधिशांनी चार दिवस प्यायले साप मेलेले दूषित पाणी प्रकृती बिघडली; शासकीय निवासस्थान साेडण्याची नामुष्की
5
हेड- क्लासेन जोडीनं जोर लावला; शेवटी ३०० पारचा नारा अधुरा! पण SRH नं वर्ल्ड रेकॉर्ड केला भक्कम
6
कोल्हापूरच्या घाटक्षेत्रात २९ पर्यंत ऑरेंज अलर्ट; दोन दिवसांतच मान्सून महाराष्ट्रात धडकणार
7
तेजप्रताप यादवच नाही तर या बड्या नेत्यांच्या प्रेमप्रकरणांवरूनही झाला होता वाद, अशी आहे यादी
8
SRH vs KKR: वादळी खेळीसह क्लासेनची विक्रमी सेंच्युरी! पण वैभव सूर्यंवशीच्या तो मागेच राहिला
9
विधानसभा निवडणुकांसाठी सरकारची रणनीती; PM मोदींनी NDAच्या बैठकीत दिला विजयाचा मंत्र
10
पुढचा प्लॅन काय? धोनीनं घरची ओढ अन् या गोष्टीवर प्रेम व्यक्त करत असा टाळला तो विषय
11
शाहजहांपूर मेडिकल कॉलेजमध्ये फॉर्मेलिन गॅस गळती, रुग्णालयात चेंगराचेंगरी; एक मृत
12
बोलण्यावर संयम ठेवा, ऑपरेशन सिंदूरवर अनावश्यक विधाने टाळा; PM मोदींच्या BJP नेत्यांना सूचना
13
त्या निवेदनातून माझे नाव वगळा, दुसरे नाव टाका;पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकरांची ऑडिओ क्लिप व्हायरल
14
भारताला चीनपासून सर्वात मोठा धोका, चहुबाजूंनी घेरण्यासाठी विणतोय जाळं, अमेरिकेच्या गोपनीय अहवालातून गौप्यस्फोट 
15
GT ला मोठा धक्का! CSK वर पहिल्यांदाच आली तळाला राहण्याची वेळ; पण जाता जाता त्यांनी MI ला दिलं गिफ्ट
16
निरा डावा कालव्याला भगदाड..! बारामती परिसरात नागरिकांच्या घरात-शेतात पाणीच पाणी
17
धक्कादायक! चेंजिंग रूममध्ये कॅमेरा बसवला होता, महिलांचे कपडे बदलतानाचे व्हिडीओ व्हायरल
18
'...तर तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही', जरांगे पाटलांचा मुख्यमंत्री फडणवीसांना थेट इशारा
19
"मी एका खोलीच्या घरात राहतो, कर्जबाजारी..."; सीबीआयच्या आरोपपत्रावर सत्यपाल मलिक म्हणाले,...
20
पीएम मोदींचा पाकिस्तान दौरा अन् 2016 चा पठाणकोट हल्ला..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य

आॅनलाईन व आॅफलाईन शिक्षणावर चर्चासत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2020 12:51 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : आॅनलाईन व आॅफलाईन शिक्षण देतांना जिल्हा परिषद शिक्षकांना कुठल्या अडचणींना सामोरे जावे लागते, त्या ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : आॅनलाईन व आॅफलाईन शिक्षण देतांना जिल्हा परिषद शिक्षकांना कुठल्या अडचणींना सामोरे जावे लागते, त्या सोडविण्यासाठी काय करता येईल यासह इतर विविध विषयांवर नंदुरबार तालुक्यातील जिल्हा परिषद शिक्षकांसाठी आयोजित चर्चासत्रात मार्गदर्शन करण्यात आले.चर्चासत्रास सातारा येथील तंत्रस्रेही शिक्षक किरण शिंदे हे वक्ते म्हणून होते. प्रस्ताविकात गटशिक्षणाधिकारी डॉ. राहुल चौधरी यांनी कोविड -१९ या जागतिक महामारी मध्ये सद्यस्थितीतून आपण सर्व जात असताना मार्च २०२० पासून शाळा बंद आहेत, विद्यार्थी घरी आहेत.या परिस्थितीत मुलांचे शिक्षण चालू राहावे यासाठी राज्य स्तरावरून अभ्यास माला, दीक्षा अ‍ॅप , टिली मिली कार्यक्रम हे उपक्रम चालू आहेत. मात्र हे करत असताना काही मर्यादा, अडचणी आहेत त्यातूनही शिक्षक आॅनलाईन-आॅफलाईन शिक्षण विद्यार्थ्यांपर्यंत पोहचण्यासाठी सतत प्रयत्न करत आहेत. हे प्रयत्न अजुन नेमकेपणाने आणि दिशादर्शक होण्यासाठी या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.प्रमुख वक्ते किरण शिंदे यांनी आॅनलाईन आॅफलाईन शिक्षणातील अडचणी, आॅफलाईन माध्यम , समाज सहभाग, आॅनलाईन अध्यापन पद्धती यावर सादरीकरण करून शिक्षकासोबत चर्चासत्राच्या माध्यमातून सवांद साधला.गटशिक्षणाधिकारी आणि जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांनी मिनी स्कूल, वर्क शीट, विविध पद्धतींचा प्रभावी वापर, लोकसहभाग/पालक सहभाग या माध्यमातून तालुक्यातील प्रत्येक मुलांपर्यंत शिक्षण पोहचविण्याचे नियोजन करण्यात आले.केंद्रप्रमुख वसंत पाटील यांनी आभार मानले. विस्तार अधिकारी सचिन गोसावी, एस .एन पाटील, डी. जी. वसावे, केंद्रप्रमुख रविकांत ठाकरे उपस्थित होते.सूत्रसंचालन सोनल शिंदे यानी केले. कार्यशाळेस एकूण जि प शाळे मधील शिक्षक व क्षेत्रिय अधिकारी असे एकूण १८७ सदस्य सहभागी झाले होते.नंदुरबार तालुक्याची सद्य स्थिती लक्षात घेता २५-२६% विद्यार्थ्यांच्या पालकाकडे अँड्रॉइड मोबाईल आणि सुविधा आहेत याचा विचार करता प्रत्येक मुलापर्यत शिक्षण पोहचविण्यासाठी आॅनलाईन आणि आॅफलाईन या दोन्ही पद्धतींचा प्रभावी वापर सद्य स्थितीत गरजेचा आहे. कोविड- १९ परिस्थिती मध्ये तालुक्यामध्ये काम करत असलेल्या शिक्षक व पालकांना दिशा देण्याच्या उद्देशाने आयोजन करण्यात आले.