२०१९ साली झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत लोकनियुक्त सरपंचपदी वंदनाबाई राजाराम मोरे यांची निवड करण्यात आली होती. ग्रामपंचायत सदस्यांच्या सर्वानुमते उपसरपंच पदासाठी तीन-तीन वर्षांचा कार्यकाळ ठरविला आहे. २०१९ मध्ये माधवराव पहाडा पाटील यांची उपसरपंचपदी निवड करण्यात आली होती. उपसरपंच माधवराव पाटील यांचा उपसरपंच पदाचा कार्यकाळ संपल्यावर त्यांनी राजीनामा देत झालेल्या निर्णयानुसार सदस्यांच्या बैठकीत ग्रा.पं. सदस्या संगीता डिंगबर पाटील यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली. सरपंच वंदनाबाई मोरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. त्यात ब्राह्मणपुरी ग्रामपंचायतीची धुरा उच्चशिक्षित असलेल्या महिला सरपंच व उपसरपंच यांच्या हाती दिल्याने गावाच्या विकासाला नक्कीच चालना मिळण्यास मदत होणार असल्याची चर्चा ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. पॅनल प्रमुख विजय विठ्ठल पाटील, विनायक पाटील, डॉ. रघुनाथ पाटील, मुरलीधर पाटील, रवींद्र पाटील, प्रकाश पाटील, अरुण पाटील, संजय मराठे, रवींद्र पाटील यांनी अभिनंदन केले. निवडणुकीत सचिव म्हणून ग्रामसेवक भटू न्याहळदे यांनी सांभाळली. या वेळी ग्रामपंचायत सदस्य माधवराव पाटील, अंबालाल पाटील, अनिल पावरा, जंगा मोरे, संगीता राजपूत, आजूबाई तेली, गुंताबाई पवार, कविता नेवरे उपस्थित होते.
ब्राह्मणपुरीच्या उपसरपंचपदी संगीता पाटील यांची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:32 IST