शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

नवापूर तालुक्यात 12 लाख रुपयांचे लाकूड जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2019 12:48 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर : तालुक्यातील वावडी गावात दोन घरांच्या झडतीत सुमारे 12 लाख रुपये किमतीचे खैर, शिसम व ...

लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर : तालुक्यातील वावडी गावात दोन घरांच्या झडतीत सुमारे 12 लाख रुपये किमतीचे खैर, शिसम व साग प्रजातीचे अवैध तोडीचे साठवून ठेवलेले लाकूड  वनविभागाच्या पथकाने शुक्रवारी सहायक वनसंरक्षक गणेश रणदिवे  यांच्या मार्गदर्शनाखाली चित्तथरारक पद्धतीने छापा टाकून जप्त केले. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सहायक वनसंरक्षक गणेश रणदिवे यांच्या मार्गदर्शनाखाली नवापूरचे वनक्षेत्रपाल प्रथमेश हाडपे, चिंचपाडाचे वनक्षेत्रपाल  आर.बी. पवार यांनी नंदुरबार, नवापूर व चिंचपाडा वनविभागातील कर्मचा:यांनी  नवापूर तालुक्यातील वावडी गावात दोन घरांवर धाड       टाकून झडती घेतली. त्यात ताज्या तोडीचे अवैधपणे साठवून ठेवलेले खैर, शिसम व साग प्रजातीचे लाकूड साठा जप्त केला. लाकडाचा               एवढा मोठा साठा प्रथमच ताब्यात घेण्यात आल्याने लाकूडचा साठा नवापूर येथील काष्टआगारात आणण्यासाठी दोन टेम्पो व चार पिकअप जीपचा वापर करावा लागला.  जप्त केलेल्या मालाची अंदाजित किंमत सुमारे 12 लाख रुपये असावी असा अनुमान आहे. वनविभागाच्या कारवाईदरम्यान शेकडोंचा जमाव एकत्रित झाल्याने चित्तथरारक पद्धतीने लोकांच्या जमावातून वाहनात माल भरून मुद्देमाल नवापूर काष्टआगारात जमा करण्यात वनविभागास यश आले. वावडी गावात प्रथमच अशी धाडसी कारवाई करण्यात आली. आजर्पयतची ही सर्वात मोठी कारवाई करण्यात आल्याने वनविभागाच्या धाडसाचे कौतुक होत आहे. या कारवाईत सहायक वनसंरक्षक गणेश रणदिवे, नवापूरचे वनक्षेत्रपाल प्रथमेश हाडपे, चिंचपाडा वनक्षेत्रपाल  आर.बी. पवार, वनपाल प्रकाश मावची, संजय पाटील, युवराज भाबड, डी.के. जाधव, वनरक्षक अरविंद निकम, भूपेश तांबोळी, कल्पेश अहिरे, एस.डी. बडगुजर, एन.आर. पाटील, अशोक पावरा, एन.टी. थोरात, कमलेश वसावे, प्रशांत सोनवणे, प्रतिभा बोरसे, रेखा गिरासे, आरती नगराळे, दिपाली पाटील, वाहन चालक एस.एस.  तुंगार, माजी सैनिक विशाल          शिरसाठ, नाना पिंपळे, एस.व्ही. मोरे, आर.एस. कासे यांच्यासह वनमजूर          व कर्मचारी सहभागी झाले. याप्रकरणी दोन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्याच्या हद्दीत शिसम व खैर लाकूडचे मोठे नग व इतका साठाच नसल्याने हे लाकूड गुजरात राज्यातून आणण्यात आल्याचा कयास लावला जात आहे. यासंदर्भात गुन्हा दाखल झाला असून चिंचपाडाचे वनक्षेपाल आर.बी. पवार यांनी प्रथम अहवाल जारी केला आहे.