शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

दुस:या टप्प्याचे अॅपद्वारे सव्र्हेक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2019 12:56 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्हा हगणदारीमुक्त झाला असला तरी शाश्वत स्वच्छतेसाठी उभारण्यात आलेल्या सुविधांच्या पडताळणीसाठी मोबाईल अॅपद्वारे पुन्हा ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्हा हगणदारीमुक्त झाला असला तरी शाश्वत स्वच्छतेसाठी उभारण्यात आलेल्या सुविधांच्या पडताळणीसाठी मोबाईल अॅपद्वारे पुन्हा सव्र्हेक्षण करण्यात येणार आहे. यासंदर्भात नुकतीच जिल्हास्तरीय कार्यशाळा नंदुरबारात झाली. जिल्हा परिषदेच्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत पडताळणी टप्पा क्रमांक दोनचे प्रशिक्षण झाले. मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित कार्यशाळेचे उद्घाटन उपमुख्य कार्यकारी अधिकारी सारिका बारी यांच्या हस्ते करण्यात आले. उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिकेत पाटील,गटविकास अधिकारी अशोक पटाईत, चंद्रकांत कचरे यांच्यासह जिल्ह्याचे सर्व गटविकास अधिकारी उपस्थित होते.नंदुरबार जिल्हा मार्च 2018 मध्ये पायाभूत सव्र्हेक्षणानुसार हगणदारीमुक्त घोषीत करण्यात आला आहे. हगणदारीमुक्त झालेल्या ग्रामपंचायतींमध्ये निर्माण झालेल्या स्वच्छता सुविधांचा नियमित वापर करून स्वच्छता सुविधांची शाश्वतता अबाधीत ठेवावी याकरीता पडताळणी होणार आहे. स्वच्छता विभागातर्फे ग्रामपंचायतीअंतर्गत शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र व सार्वजनिक ठिकाणे तसेच वैयक्तिक कुटूंबांच्या स्वच्छता सुविधांची    पहाणी होणार आहे. त्यासाठी पंचायत समिती स्तरावर समिती गठीत   करण्यात येणार आहे. यासाठी स्वतंत्र मोबाईल अॅप तयार करण्यात आले आहे. प्रशिक्षणास सर्व गटविकास अधिकारी, सहायक गटविकास अधिकारी, ग्रामपंचायत, शिक्षण, आरोग्य, उमेद व कृषी विभागाचे सर्व विस्तार अधिकारी व संबधीत कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचलन योगेश कोळपकर यांनी केले. 

नंदुरबार जिल्हा गेल्या वर्षीच हगणदारीमुक्त घोषीत करण्यात आला आहे. जिल्ह्यातील कुटूंबांच्या तुलनेत शौचालयांची निर्मिती करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यानंतर आता हगणदारीमुक्तीचा दुसरा टप्पा सुरू होणार आहे. त्याअंतर्गत शासनाच्या निर्देशानुसार सव्र्हेक्षण केले जाणार आहे. शाश्वत स्वच्छतेसाठी अधिकारी, कर्मचा:यांना मोबाईल अॅपद्वारे सव्र्हेक्षण करण्याची मुभा आहे.