शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

शहाद्यात सलग दुस:या दिवशी धाडसी चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 12:42 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : शहाद्यात सलग दुस:या दिवशी धाडसी चोरी होऊन चोरटय़ांनी साडेदहा तोळे सोन्याचे दागीने लांबविले. गुरुवारी ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : शहाद्यात सलग दुस:या दिवशी धाडसी चोरी होऊन चोरटय़ांनी साडेदहा तोळे सोन्याचे दागीने लांबविले. गुरुवारी सायंकाळी एका व्यापा:याची पावणे दोन लाख रुपये रक्कम असलेली बॅग चोरटय़ांनी लांबविल्यानंतर ही घटना घडल्याने शहादेकरांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत शहादा पोलिसात नोंद करण्यात आली आहे.शुक्रवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास गुजर गल्ली भागात राहणारे गिरधर शंकर पाटील यांच्या घरात चोरटय़ांनी डल्ला मारला. पाटील यांच्या प}ी गोदावरी गिरधर पटेल या घरात एकटय़ा असतांना दोन युवक घरात आले. त्यांनी घराची सफाई करून देण्याचे सांगितले. परंतु महिलेने त्यांना नकार दिला. तरीही त्यांनी जबरीने घरात घुसून सफाईला सुरुवात केली. त्यानंतर महिलेच्या हातातील आठ तोळ्याच्या चार सोन्याच्या बांगडय़ा व अडीच तोळ्याची सोन्याची पोत त्यांनी पॉलीश करण्याच्या बहाण्याने काढून घेतली. त्याची किंमत सध्याच्या बाजार भावाप्रमाणे साडेतीन लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर ते घराच्या मागील दरवाजाने पसार झाले. ही बाब गोदावरीबाई यांना समजल्यानंतर त्यांनी आरडाओरड केली. परंतु तोर्पयत चोरटे पसार झाले होते. नगरसेवक राकेश सुभाष पाटील यांनी याबाबत पोलिसांना कळविले. पोलिसांनी घटनास्थळी भेट देवून तपास केला. सीसीटीव्ही फुटेज तपासले असता दोन युवक तेथून पळत असल्याचे स्पष्टपणे दिसले आहे. याबाबत सायंकाळी उशीरा शहादा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.वसुली करणा:या व्यापा:याचे पावणेदोन लाख लंपासगुरुवारी देखील शहाद्यात धाडसी चोरी झाली. नंदुरबार येथील व्यापारी गौतम जैन यांच्या होलसेल किराणा दुकानातून शहाद्यातील काही व्यापारी माल खरेदी करतात. त्यांच्याकडील उधारी वसुलीसाठी या दुकानाचा कर्मचारी विलास दामू पाटील हे गुरुवारी शहादा येथे आले होते. काही ठिकाणाहून वसुली केल्यानंतर ते बसस्थानक परिसरातील जैन किराणा दुकानावर वसुलीसाठी गेले असता तेथे नोटा मोजत असतांना त्यांच्याकडील पैशांची बॅग लंपास करण्यात आली. बॅगेत एक लाख 72 हजार 55 रुपये रोख होते. दोन ते पाच मिनीटात हा सर्व प्रकार झाला. परिसरात शोधाशोध केली असता उपयोग झाला नाही. पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यात एक लहान मुलगा बॅग अलगद उचलून निघाला. पुढे त्याला दोन इसमांची सोबत मिळाल्याचे स्पष्ट झाले. शहादा पोलिसात विलास दामू पाटील यांनी फिर्याद दाखल  केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला.दरम्यान, 24 तासात सलग दोन धाडसी चो:या झाल्याने शहाद्यातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरात चोरीचे सत्र वाढले आहे. चोरटय़ांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शहरवासीयांमधून करण्यात येत आहे.