शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

भाजीपाल्याची शोधाशोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2019 11:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : बाजार समिती कर्मचा:यांच्या दोन दिवसांपासूनच्या संपामुळे बाजारात भाजीपाला येत नसल्याची स्थिती आहे. मंगळवारी नंदुरबारचा ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : बाजार समिती कर्मचा:यांच्या दोन दिवसांपासूनच्या संपामुळे बाजारात भाजीपाला येत नसल्याची स्थिती आहे. मंगळवारी नंदुरबारचा आठवडे  बाजार असतांनाही भाजीपाला विक्रेत्यांचा शोध घ्यावा लागत होता. ज्या विक्रेत्यांकडे होता त्यांनी देखील दुप्पट भाव केल्याने ग्राहकांची मोठी परवड झाली. दरम्यान, बाजार समिती कर्मचा:यांनी आपले कामबंद आंदोलन कायम ठेवले असून नंदुरबारसह चारही बाजार समितींमध्ये शुकशुकाट आहे.राज्यातील बाजार समिती कायम कर्मचा:यांना शासकीय सेवेत सामावून घ्यावे या मागणीसाठी गेल्या अनेक वर्षापासून कर्मचा:यांचा लढा सुरू आहे. त्याचअंतर्गत सोमवार, 5 ऑगस्टपासून कर्मचा:यांनी बेमुदत कामबंद आंदोलन पुकारले आहे. त्यामुळे जवळपास दैनंदिन 50 लाखांचा व्यवहार ठप्प झाला आहे. कामबंद आंदोलनाचा मंगळवारी दुसरा दिवस होता. त्याचे परिणाम आता जाणवू लागले आहेत.बाजार असूनही भाजीपाला नाहीमंगळवारी नंदुरबार व शहादा येथील आठवडे बाजार असतो.  बाजारात ताजा भाजीपाला खरेदीसाठी ग्राहकांची विशेषत: महिलांची मोठी गर्दी होत असते. नेहमीप्रमाणे मंगळवारी सकाळी महिला वर्गाने भाजीपाला खरेदीसाठी बाजारात धाव घेतली. परंतु किरकोळ एक, दोन विक्रेते सोडता कुठेही भाजीपाला विक्रेते नजरेस पडत नव्हते. त्यामुळे महिला वर्गासह ग्राहकांचाही हिरमोड झाला. दोन दिवसांपासून भाजीपाला खरेदी-विक्रीच झाली नसल्याचे बाजार समिती सूत्रांनी सांगितले.  भाव कडाडलेभाजीपाल्याचा लिलाव होत नसल्यामुळे भाव कडाडले आहेत. सर्वच पालेभाज्या आणि फळवर्गीय भाज्यांचे दर भडकले आहेत. सर्वच भाज्या या दुप्पट दराने विक्री होत आहेत. 

सोमवारपासून भाजीपाला मार्केटमध्ये भाजीपाल्याचा लिलावच झाला नाही. त्यामुळे लाखोंचा व्यवहार ठप्प झाला आहे. नंदुरबारात तालुक्यासह साक्री, पिंपळनेर, नवापूर, तळोदा भागाकडून भाजीपाला विक्रीसाठी येतो. सध्या पावसाळा सुरू असल्यामुळे भाज्यांची आवक मोठय़ा प्रमाणावर आहे. पालेभाज्या या नाशवंत असल्यामुळे त्यांची लागलीच विक्री होणे आवश्यक असते. परंतु भाजीपाल्याचा लिलावच होत नसल्यामुळे शेतक:यांनी आणलेला भाजीपाला स्वत:च थेट विक्री केल्याचे दिसून आले. शहरातील महाराणा प्रताप चौक, अमर चित्रमंदीर, दिनदयाल चौक आदी  परिसरात अनेक शेतक:यांनी टेम्पो आणून भाजीपाला विक्री केल्याचे चित्र मंगळवारी सायंकाळी दिसून आले.