लोकमत न्यूज नेटवर्कधडगाव : जनार्थ आदिवासी विकास संस्था, टाटा ट्रस्ट व अस्माई इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने धडगाव तालुक्यातील 15 आश्रशाळा आणि जि़प़शाळांमध्ये बालमेळाव्यांचे आयोजन करण्यात आले होत़े काकडदा, चुलवड, सोन, सुरवाणी, वेली, जमाना, मांडवी बुद्रुक, अक्राणी, राजबर्डी आश्रमशाळा तर मांडवी खुर्द, धडगाव, कुंडल, बोरीडाबरा, सिसा, सुर्यपुर या 15 जिल्हा परिषद शाळांमध्ये सुरु असलेल्या बालभवनांमध्ये बुधवारी हे बालमेळावे घेण्यात आले. यात दीड हजार विद्याथ्र्यांनी सहभाग घेतला. मुलांच्या सुप्त कलागुणांना सादर करण्याची संधी मिळावी, त्यांचा आत्मविश्वास वाढावा, शाळा एके शाळा या नियमित जिवनातून थोडी विश्रांती घेऊन विद्याथ्र्याना आनंद उत्सव साजरा करण्यासाठी बालमेळावा घेण्यात आला. बालमेळाव्यात नाटीका, आदिवासी समूह नृत्य, अभिनय, गीते, हस्तकला, स्ट्रॉ पासून बनविलेली पिपाणी, कागदापासून पंखा इत्यादी वस्तू बनवून सांस्कृतिक कार्यक्रम पावरी-भिलोरी भाषेमध्ये विद्याथ्र्यानी सादर केल़े मेळाव्याला मुख्याध्यापक, वर्ग शिक्षक, गावातील पालक व शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य यांनी उपस्थिती देत विद्याथ्र्याचे कौतूक केल़े 15 गावांमध्ये एकाच दिवशी बालमेळावे घेण्यात आले. कार्यक्रमास जनार्थ आदिवासी विकास संस्थेचे संचालक विक्रम कान्हेरे, समन्वयक शिवाजी घोडराज यांचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे रमेश मोरे, चामसिंग पावरा, सतू पावरा, ममता तडवी, प्रमिला पावरा, कविता वळवी, मनोहर वळवी, गणपत वळवी, महेंद्र ठाकरे, उत्तम मोरे, भरत गवळे, दिनेश नवेज, रुपसिंग पावरा, दिलीप पावरा, राकेश पावरा, खिलिप वळवी, गणपत वळवी, अनवर वळवी, राकेश साळवे, पर्यवेक्षक अशोक पाडवी, संभाजी पावरा, मनोज राठोड, अनंत पावरा यांनी परिश्रम घेतल़े
धडगाव तालुक्यातील शाळांमध्ये बालमेळावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2019 12:01 IST