शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
4
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
5
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
6
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना कोरा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
7
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
8
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
9
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
10
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
11
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
12
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
13
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
14
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
15
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
16
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
17
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
18
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
19
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
20
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी

भर पावसाळ्यात टंचाईचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2019 12:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जुलै महिना संपत आला, पावसाळ्याचे पावणेदोन महिने उलटले तरी शहराला पाणी पुरवठा करणा:या विरचक ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जुलै महिना संपत आला, पावसाळ्याचे पावणेदोन महिने उलटले तरी शहराला पाणी पुरवठा करणा:या विरचक प्रकल्पात पाणी साठा होत नसल्याने शहरवासीयांवर पाणी टंचाईचे गंभीर संकट घोंगावत आहे. गेल्या आठवडय़ात झालेल्या दमदार पावसामुळे अवघा दीड टक्का पाणी साठा वाढून तो 9.10 टक्क्यांवर पोहचला आहे. ऑगस्टच्या पहिल्या आठवडय़ार्पयत पाणी साठय़ाची हीच स्थिती राहिल्यास पाणी कपात करावी लागणार आहे.   नंदुरबार शहराला शिवण नदीवरील विरचक प्रकल्पातून 70 टक्के तर आंबेबारा प्रकल्पातून 30 टक्के पाणी पुरवठा केला जातो. यंदा आंबेबारा प्रकल्प मे महिन्यातच कोरडा झाला. तर विरचक प्रकल्पात अत्यल्प पाणीसाठा राहिला. परिणामी पाणी पुरवठय़ाची सर्व मदार ही विरचकवर आल्याने गेल्या दोन महिन्यांपासून पाणी पुरवठय़ात मोठय़ा प्रमाणावर अडचणी निर्माण होत आहेत. पावसाळा सुरू होऊनही..यंदा पावसाळा सुरू होऊनही विरचक प्रकल्पातील पाणी साठय़ात वाढ होत नसल्याची स्थिती आहे. गेल्या एक महिन्यापासून डेड स्टॉक अर्थात मृत साठय़ाचेच पाणी पालिका उचलते आहे. पावसाळा सुरू होऊन पावणेदोन महिने झाले तरी प्रकल्पातील पाणी साठा वाढला नाही. गेल्या आठवडय़ात नंदुरबार तालुक्यात झालेल्या 61 मि.मी.पावसामुळे पाणीसाठय़ात  किमान दीड टक्का तरी वाढ होण्यात मदत झाली आहे. सध्या या प्रकल्पात 9.10 टक्के पाणी साठा आहे. जोही साठा आहे तो डेड स्टॉकच्या गणतीत धरला जातो. गेल्या वर्षी याच तारखेर्पयत प्रकल्पात 20 टक्केपेक्षा अधीक पाणीसाठा होता. त्यामुळे यंदाची परिस्थिती गंभीर असल्याचे चित्र आहे.अन्यथा पाणी कपातपालिकेने जुलै महिन्याच्या पहिल्या आठवडय़ापासूनच दोन दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचे नियोजन केले होते. परंतु पाऊस येईल या अपेक्षेने ते पुढे ढकलले. सुदैवाने गेल्या आठवडय़ात दमदार पाऊस झाल्याने किंचत पाणी साठा वाढ होण्यास मदत झाली. त्यामुळे दोन दिवसाआड पाणी पुरवठय़ाचे नियोजन पुढे ढकलले गेले. परंतु हीच स्थिती ऑगस्टच्या पहिल्या आठवडय़ार्पयत कायम राहिली तर शहरवासीयांना दोन दिवसाआड पाणी पुरवठय़ाला सामोरे जावे लागणार आहे. वरुणराजाची कृपा कशी राहते यावरच आता शहरवासीयांवरील पाणी कपातीचे संकट अवलंबून राहणार आहे. आंबेबारातही ठणठणाटनवापूर, साक्री आणि नंदुरबार तालुक्यांच्या सिमेवरील माळमाथा परिसरात दमदार पाऊस झाल्यास या भागातील नाल्यांना पाणी येवून ते शिवण नदीला येवून मिळतात. परिणामी खोलघर आणि आंबेबारा ही मातीची धरणे भरली जातात. सध्या या भागात देखील पाऊस नसल्याने ही दोन्ही धरणे कोरडे आहेत. परिणामी आंबेबारा धरणातील पाणी आष्टे पंपींग स्टेशनवरून उचलणे बंदच आहे. या भागातील पजर्न्यमान चांगले राहिले तर या दोन्ही धरणांसह शिवण नदीला पाणी येवून ते विरचक प्रकल्पात साठवले जाते. परंतु पावसाळ्याच्या दोन महिन्यात अपेक्षीत पाऊसच झाला नसल्यामुळे शिवणनदी आणि पर्यायाने विरचक प्रकल्प तहानलेलाच आहे. पाणी जपून वापरावेसद्य स्थितीत पाणी टंचाई लक्षात घेता शहरवासीयांनी पाणी जपून वापरावे असे आवाहन पालिकेने केले आहे. ज्यांच्याकडे खाजगी कुपनलिका आहेत त्यांनी जलपुनर्रभरणसारखे प्रयोग करून आपल्या कुपनलिका जिवंत करून घेणेही फायदेशीर ठरणार आहे. सध्या पाणी पुरवठा नियमित राहणार असला तरी पुढील 15 दिवसात पावसाचे प्रमाण कसे राहील यावर पाणी कपातीचा निर्णय अवलंबून राहणार असल्याचे पाणी पुरवठा सभापती कैलास पाटील यांनी स्पष्ट केले. 

दुर्दैवाने पावसाची स्थिती अशीच राहिली तर विरचक प्रकल्पात पाणी साठा होणार नाही. परिणामी शहरवासीयांवर पाणी टंचाईचे गंभीर संकट ओढावेल. ही बाब लक्षात घेता पालिकेने पर्यायी नियोजनही तयार ठेवणे आवश्यक आहे. पूर्वी प्रकाशा बॅरेजवरून 30 किलोमिटर पाईपलाईन करून पाणी आणण्याचा पर्याय तयार ठेवण्यात आला होता. त्यादृष्टीनेही पालिकेने विचार    करणे आवश्यक आहे. याशिवाय आणखी दुस:या कुठल्या मार्गाने शहरात पाणी आणता येईल याचाही विचार होणे आवश्यक आहे. सुदैवाने तशी परिस्थिती ओढावू नये अशी अपेक्षा व प्रार्थना मात्र शहरवासी करीत आहेत.