शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
2
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
3
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
4
अर्चनानंतर आता श्रद्धा तिवारी गायब...; कुटुंबानं मुलीचा उलटा फोटो दरवाजाच्या चौकटीला लावला
5
खळबळजनक! कॉन्स्टेबलने कुटुंबीयांच्या मदतीने पत्नीला जिवंत जाळलं, प्रकृती गंभीर
6
ChatGPT ने मुलाला आयुष्य संपवण्याचे ट्यूशन दिले, पालकांनी न्यायालयात सगळीच माहिती सांगितली
7
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
8
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
9
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
10
बाप्पाला आणताना, नेताना, पूजा करताना मूर्तीचा भाग 'दुभंगला' तर अशुभ? धर्मशास्त्र सांगते... 
11
गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन, प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस
12
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
13
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
14
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
15
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या
16
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
17
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' क्षेत्रांना कमी तर 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
18
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
19
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
20
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!

दोन दिवसांच्या अतिवृष्टीनंतर सावरतोय जिल्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2019 11:40 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : दोन दिवसांच्या अतिवृष्टीनंतर जिल्हा सावरू लागला आहे. सातपुडय़ाच्या द:याखो:यातील रस्ते, पूल, फरशी वाहून गेले ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : दोन दिवसांच्या अतिवृष्टीनंतर जिल्हा सावरू लागला आहे. सातपुडय़ाच्या द:याखो:यातील रस्ते, पूल, फरशी वाहून गेले असून अनेक ठिकाणी वाहतूक अद्यापही बंदच आहे. सपाटीवरील भागातील शेकडो एकर शेती पाण्याखाली असून काही ठिकाणी शेतीचे नाल्यात रुपांतर झाले आहे. पावसाच्या उघडीपनंतर प्रशासनाने पंचनाम्यांना गती दिली आहे.धडगाव तालुक्यात अनेक रस्ते बंदअक्कलकुवा व धडगाव तालुक्यातील सातपुडय़ाच्या अतिदुर्गम डोंगराळ भागातील गाव व पाडय़ांमध्ये आठवडाभर अतिवृष्टी झाल्याने नागरिकांचा संपर्क तुटला आहे. गाव व पाडय़ांना जोडणारे रस्ते, पूल पाण्याखाली गेल्याने जनजीवन ठप्प झाले आहे. अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली असून संसारोपयोगी साहित्य, धान्य, गुरांसह शेतातील उभी पिके पाण्यात वाहून गेल्याने शेतक:यांचे अतोनात नुकसान झाले आहे. गेल्या दोन दिवसांपासून आमदार अॅड.के.सी. पाडवी हे नुकसानग्रस्त भागात जाऊन पाहणी करीत आहेत. या भागातील दळणवळवण सुरू करण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. अनेक ठिकाणी शेतातील कापूस, भात, मका, उडीद, चवळी, ज्वारी व इतर पिके पाण्याखाली गेली आहेत. शेतांमध्ये पाणी साचल्याने पिके खराब होत आहेत. नुकसानीचे पंचनामे करून नुकसानग्रस्तांना तातडीने भरपाई देण्याची सूचना आमदार अॅड.पाडवी यांनी महसूल व कृषी विभागाला दिल्या आहेत. अतिवृष्टीमुळे आरोग्याची समस्या उद्भवू नये म्हणून धडगाव रुग्णालयाचीही त्यांनी पाहणी केली.वेलखेडी व डेब्रामाळ येथेघरांची पडझडअक्कलकुवा तालुक्यातील डोंगराळ भागातील वेलखेडी येथे पावसाच्या संततधारेमुळे नदीजवळील एकाचे कौलारू घरासह चार विजेचे खांब वाहून गेले तर डेब्रामाळ येथील एकाचे कौलारू घर कोसळून नुकसान झाले आहे. वेलखेडी येथील वनसिंग तुक्या तडवी यांच्या घराचा काही भाग कोसळू लागताच घरातील सदस्य घराबाहेर निघाले व बघता बघता पूर्ण घरच पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. यात घरातील कोंबडय़ा व संसारोपयोगी साहित्य पूर्ण वाहून गेल्याने त्यांचे  मोठे नुकसान झाले. बारीपाडा येथील सरपंच यांच्या घराजवळील चार विजेचे खांब तारांसह वाहून गेले तर डेब्रामाळच्या कारभारीपाडा येथील राया बिज्या वळवी यांचे कौलारू घर कोसळून पडल्याने मोठे नुकसान झाले आहे.भराव खचल्यानेडेब्रामाळकडे जाणारा रस्ता बंदअक्कलकुवा तालुक्यातील भगदरी ते वेलखेडी दरम्यान बारीपाडय़ाच्यावर पावसाच्या संततधारेमुळे रस्त्याचा भराव वाहून रस्त्याला मोठे भगदाड पडले आहे. डेब्रामाळकडे जाणारा रस्ता पूर्ण बंद झाला आहे. त्यामुळे डेब्रामाळ, पळासखोब्रा, सांबर, कंजाला,          मांडवा, डनेल, बुंदेमालपाडा,            मुखडी, अक्राणीच्या माकडखुंट, सुपवापाडा, आंबावावीपाडा या गाव व पाडय़ातील नागरिकांचे हाल होत आहेत. या भागातील नागरिकांना पायवाटेचा आधार घ्यावा लागत आहे. संबंधित विभागाने रस्ता सुरळीत करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी सरपंच भिमसिंग राजा वळवी, पोलीस पाटील पोपटीबाई सखाराम वळवी, उपसरपंच वनकर नोबल्या वळवी व नागरिकांनी केली आहे.वैजाली व नांदर्डेत पिकांचे नुकसानशहादा तालुक्याती वैजाली गावात मुसळधार पावसामुळे वाकी नदीला आलेल्या पुराचे पाणी वैजाली व नांदर्डे गावात व शेतात शिरल्याने उभ्या पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झालेले आहे. यावर्षी पाऊस वेळेवर न झाल्याने उशिरा पेरण्या झाल्या. नंतर टप्प्याटपप्प्याने पाऊस आल्याने पिके चांगलीच बहरू लागली होती. वेळेवर निंदणी, कोळपणी, खते दिल्याने पीक पिरस्थिती चांगली दिसत असताना गेल्या आठवडाभरापासून पावसाची रिपरिप सुरू होती. मात्र शनिवारी रात्रीपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाल्याने परिसरातील नदी-नाल्यांना मोठे पूर आल्याने नांदर्डे गावातील आदिवासी वस्तीतील घरांमध्ये वाकी नदीचे पाणी शिरले. वैजाली गाव हे वाकी नदीच्या काठावर वसले असून गावात व शेतात नदीने उग्र रूप धारण केले होते. शेतातील उभे पिके जमीनदोस्त झाली आहेत. सोनवलतर्फर्ेे बोरद गावात गावालगतच्या नाल्याचे पाणी वस्तीत गेल्याने घरांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. परिसरातील वाकी नदी नदी, देवापाठ नाला, लेंडय़ा नाला, मोत्या नाला आदींसह छोटेमोठे नाले दुथडी भरून वाहत आहेत. वैजाली येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पाण्याने वेढा घातल्याने गावातील नवीन वसाहतीतील रस्त्यावरुन पाणी वाहत होते. वाकी नदीचे पाणी शेतांमध्ये गेल्याने पूर्ण परीसर जलमय झाला होता. शासनाने झालेल्या पिकांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी शेतक:यांकडून होत आहे. गेल्या तीन वर्षापासून कोरडे असलेले नदी-नाले दुथडी भरुन वहात असल्याने पाण्यात पातळीत चांगलीच वाढ होणार असल्याचे शेतक:यांनी सांगितले.

मोड परिसरात पिकांचे नुकसानपावसाचे पाणी निघून जाण्यासाठी उपाययोजना न केल्याने मोड गावाजवळील पुनर्वसन वसाहतीत पाणी शिरुन अनेक घरे पाण्याखाली आली होती. तसेच मोड, पुनर्वसन वसाहतीतील शेतक:यांच्या शेतात पाणी शिरल्याने पिकांचे नुकसान झाले. या परिसरातील पुनर्वसन वसाहतींमध्ये व शेतांमध्ये झालेल्या नुकसानीची पाहणी नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांनी पाहणी केली. मोड, खेडले, त:हावद, खरवड शिवारात साचणारे पाणी निचरा होण्यासाठी उपाययोजना नसल्याने पावसाळ्यात शेतांमध्ये पाणी साचते व पिकांचे नुकसान होते. त्यामुळे या पाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी प्रशासनाने उपाययोजना करण्याची मागणी मोड येथील शेतकरी रमण टिला चौधरी, काशीनाथ श्रीपत चौधरी, बुलाखी रामदास पाटील, अमृत पाटील व परिसरातील गावांमधील शेतक:यांनी केली आहे. याबाबत प्रांताधिकारी व तहसीलदारांना यापूर्वीच निवेदन देण्यात आले आहे. मात्र प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.