लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : आदिवासी, भूमिहिन शेतकरी यांच्या विविध मागण्यांसाठी सत्यशोधक ग्रामिण कष्टकरी सभेतर्फे शनिवारी तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी तहसीलदारांना निवेदनही देण्यात आले. सत्यशोधक सभेतर्फे काढण्यात आलेल्या मोर्चात तालुक्यातील आदिवासी, भूमिहिन आणि अतिवृष्टीतील नुकसानग्रस्त मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते. यावेळी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वननिवासी अर्थात वनहक्क कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी. आदिवासींचे हक्क संपविणारे प्रस्तावित विधेयक तात्काळ रद्द करावे. अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे झालेल्या घरांची पडझड, पिकांचे नुकसान व जमिनीचे नुकसान यांचे तातडीने पंचनामे करून भरपाई मिळावी. शेतक:यांना सरसकट कजर्माफी, दुष्काळनिधी त्वरीत मिळावी. सर्व पिकांना पिकविमा उतरावा, त्वरीत विमा रक्कम शेतक:यांना मिळावी. डॉ.पायल तडवी आत्महत्या प्रकरणी तात्काळ कारवाई करावी. उत्तर प्रदेशातील सोनभद्र येथील आदिवासींवर वनजमीन खेडणा:या दावेदाराचे खून करणा:या गुंडावर कडक कारवाई करावी यासह इतर विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या.यावेळी किशोर ढमाले, करणसिंग कोकणी, लिलाबाई वळवी, जमुनाबाई ठाकरे, शानाबाई सोनवणे, विक्रम गावीत, मनोहर वळवी, कथ्थू भिल, मंगल वळवी, कुवरसिंग वळवी, रविदास वळवी उपस्थित होते.
सत्यशोधक सभेतर्फे तहसीलवर मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2019 12:12 IST