शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
2
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
3
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
4
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
5
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
6
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
7
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
8
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
9
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
10
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
11
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
12
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
13
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
14
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
15
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...
16
भोकरदन तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळून दोघांचा दुर्दैवी मृत्यू
17
समुद्रात तैनात केला जाणार मेड इन इंडिया 'रक्षक', गौतम अदानी यांच्या कंपनीने केली मोठी डील
18
IPL 2025: मोठी बातमी! SRHचा स्टार क्रिकेटर कोरोना पॉझिटिव्ह; काव्या मारनची डोकेदुखी वाढली!
19
'लष्कराचा पराक्रम वस्तू असल्यासारखं विकत आहेत', तिकीट दाखवत कुणी केलीये भाजपवर टीका?
20
ज्योती मल्होत्राचा पहलगाम दहशतवादी हल्ल्याशी काय संबंध? पोलिसांनी केला मोठा खुलासा...

सातपुडा शाश्वत विकासाची भगदरीत मूहुर्तमेढ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 12:09 IST

रमाकांत पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : सातपुडय़ातील आदिवासींच्या उत्थानासाठी आजवर विविध एनजीओ व सरकारी यंत्रणेमार्फत अनेक प्रयोग राबवण्यात आले, या प्रयोगांचे योजनेत रूपांतर होऊन त्या माध्यमातून आदिवासी उत्थानाची दिशा निश्चित करण्यासाठी गुरूवारी भगदरी ता़ अक्कलकुवा येथे सातपुडा शाश्वत विकास मंचची स्थापना करण्यात आली़ दरम्यान यावेळी विकासाचे विविध प्रयोग राबवणा:या संस्थांनी ...

रमाकांत पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : सातपुडय़ातील आदिवासींच्या उत्थानासाठी आजवर विविध एनजीओ व सरकारी यंत्रणेमार्फत अनेक प्रयोग राबवण्यात आले, या प्रयोगांचे योजनेत रूपांतर होऊन त्या माध्यमातून आदिवासी उत्थानाची दिशा निश्चित करण्यासाठी गुरूवारी भगदरी ता़ अक्कलकुवा येथे सातपुडा शाश्वत विकास मंचची स्थापना करण्यात आली़ दरम्यान यावेळी विकासाचे विविध प्रयोग राबवणा:या संस्थांनी व प्रशासनाने एकत्रितपणे नवे प्रयोग लोकांर्पयत पोहोचवण्याचा संकल्प केला़ भगदरी ता़ अक्कलकुवा येथे सातपुडा शाश्वत विकास परिषद झाली़ येथील कृषी विज्ञान केंद्राने पुढाकार घेऊन ही परीषद घडवून आणली़ सातपुडय़ातील धडगाव आणि अक्कलकुवा तालुक्यात विविध स्वयंसेवी संस्था तथा शासकीय व निमशासकीय संस्थांमार्फत विविध प्रयोग राबवण्यात आले आहेत़ मात्र या संस्थांमध्ये अथवा त्यांनी केलेल्या कामांमध्ये आजवर कुठलाही समन्वय नसल्याने या संस्था नेमक्या काय काम करीत आहेत़ त्याचे फलीत काय ? याबाबत ताळमेळ नव्हता़ या पाश्र्वभूमीवर कृषी विज्ञान केंद्र व योजक संस्थेतर्फे डॉ़ गजानन डांगे यांच्या संकल्पनेतून ही परिषद झाली़ या परिषदेत खासदार डॉ़हीना गावीत, जिल्हाधिकारी डॉ़ मल्लीनाथ कलशेट्टी, तळोदा आदिवासी एकात्मिक प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी विनय गौडा यांच्यासह स्थानिक प्रशासकीय अधिकारी, माजी आमदार डॉ़नरेंद्र पाडवी, कृषी विज्ञान केंद्राचे अध्यक्ष कृष्णदास पाटील, बारीपाडय़ाचे सामाजिक कार्यकर्ते चैत्राम पवार, जिल्हा परिषद सदस्य किरसिंग वसावे, डाबचे सरपंच धनसिंग वसावे, डॉ़ शशिकांत वाणी, महिला बालकल्याण विभागाच्या निवृत्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी आशा पाडवी आदी उपस्थित होत़े यावेळी धडगाव आणि अक्कलकुवा तालुक्यात विविध विकासाचे प्रयोग राबवणा:या संस्थांनी त्या भागात ते काय काम करीत आहेत़ त्याचे फलीत काय याबाबत माहिती दिली़ कृषी विज्ञान केंद्रातर्फे समन्वयक राजेंद्र दहातोंडे, टाटा ट्र्स्टतर्फे ओंकार पांडे, बायफतर्फे नाना पावरा यांनी त्या भागात राबवण्यात येणा:या शेतीचे प्रयोग, फळबागांचे प्रयोग, पाण्याचे प्रयोग, शेळीपालन, कुक्कुटपालन, औजार बँक, विविध यंत्रे, उद्योग, आमचूर, भगर प्रक्रिया केंद्र, भाजीपाला उत्पादन, नर्सरी आदी विविध प्रयोगांची माहिती देत त्यातून अनेक आदिवासी कुटूंबांच्या उत्थानाची गाथा सांगितली़ या संस्थांच्या यशोगाथा ऐकून घेतल्यानंतर खासदार डॉ़ हीना गावीत, जिल्हाधिकारी डॉ़ मल्लीनाथ कलशेट्टी यांनी काम करणा:या संस्थांचे कौतुक करीत त्यांनी राबवलेले प्रयोग प्रत्यक्षात योजनेत आणण्यासाठी पाठपुरावा करण्याची ग्वाही दिली़ ज्या योजना जिल्हा नियोजन व आदिवासी एकात्मिक प्रकल्पाच्या माध्यमातून राबवणे शक्य आह़े त्या योजना स्थानिक स्तरावर पुढाकार घेऊन सुरू करण्याचेही त्यांनी संकेत दिल़े