शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

सातपुड्डयाचे पाच लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2020 12:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : सातपुडा साखर कारखान्याने सातत्याने शेतकऱ्यांचे हित जोपासले आहे. वर्षभर मेहनत करून उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : सातपुडा साखर कारखान्याने सातत्याने शेतकऱ्यांचे हित जोपासले आहे. वर्षभर मेहनत करून उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या खिशात दोन पैसे कसे जास्त प्रमाणात जमा होतील हा विचार केला आहे. यंदाच्या हंगामात दोन हजार ३६५ रुपये प्रती मेट्रीक टन ऊसाला भाव देण्यात येणार असून कर्मचाऱ्यांना त्यांच्या वेतनाच्या ८.३३ टक्के दिवाळीचा बोनस देण्यात येणार असल्याची घोषणा कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील यांनी केली. दरम्यान, यंदा कारखान्याने साडेपाच लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठरविले आहे. सातपुडा साखर कारखान्याच्या ४६ व्या गाळप हंगामाचा शुभारंभ गव्हाणीत उसाची मोळी टाकून चेअरमन दीपक पाटील व जि.प.च्या आरोग्य तथा शिक्षण सभापती जयश्री पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. संगणीकृत वजन काट्याचे पूजन आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी कारखान्याच्या माजी अध्यक्षा कमलताई पाटील तर प्रमुख अतिथी म्हणून भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, प्रदेश सदस्य राजेंद्र गावीत, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुनील पाटील, खरेदी-विक्री संघाचे सभापती राजाराम पाटील, तालुका दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष रवींद्र रावल, पंचायत समिती सभापती बायजाबाई भिल, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रामचंद्र पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.या वेळी दीपक पाटील म्हणाले की, खान्देशात गाळप हंगाम सुरू करण्याचा  पहिला बहुमान तसेच उसाचा दर जाहीर करणारा सातपुडा साखर कारखाना एकमेव आहे. आपल्या कारखान्याने दर जाहीर केल्यानंतर जिल्ह्यातील इतर कारखाने दर जाहीर करतात. कितीही अडचणी निर्माण झाल्या तरी स्व.पी.के. अण्णांनी निर्माण केलेल्या संस्था ह्या कुठल्याच परिस्थितीत विकल्या जाणार नाहीत. काही विरोधक आपल्या संस्थांबाबत अपप्रचार करीत आहेत, अफवा पसरवत आहेत. अशांना आता त्यांची जागा दाखविण्याची वेळ आली आहे. सभासदांच्या मालकीच्या या संस्था सभासदांच्या हितासाठी आहेत. उपसा सिंचन योजना पुन्हा कार्यान्वित करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न  सुरू असून यासाठी सर्वच पक्षातील वरिष्ठ नेत्यांचे सहकार्य लाभत     आहे. यंदाच्या गळीत हंगामात सभासदांनी सातपुडा कारखान्याला ऊस द्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.आमदार राजेश पाडवी म्हणाले की, गेल्या आठ महिन्यापासून कोरोना विषाणू संक्रमण, अतिवृष्टी, दुष्काळ, ओला दुष्काळ यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून त्याचे आर्थिक गणित बिघडले आहे. यामुळे शेतकरी प्रचंड अडचणीत आला असून भविष्यात शेतकऱ्यांचा गट तयार करून शेती उपयोगी यंत्र व शासकीय योजनांच्या मदतीसाठी प्रयत्न करणार आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासकीय मदत मिळावी त्याचप्रमाणे विमा कंपन्यांशी संपर्क साधून प्रयत्न करणार आहे. तालुक्यात सिंचन क्षेत्र वाढावे यासाठी नदीवरील बंधारे पूर्ण करणार असून केंद्र शासनाच्या मदतीने शहादा  व तळोदा तालुक्यातील डोंगराळ भागातील नदी-नाल्याून वाहून जाणारे पाणी अडविण्यासाठी बंधारे बांधण्याचे नियोजन असून याकरिता १०० कोटी रुपयांची मागणी केलेली आहे. सिंचनाला माझे विशेष प्राधान्य      असून पिकांच्या संरक्षणासाठी        कृषी विभाग, आमदार निधी व सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून शेतात ड्रोनच्या माध्यमाने कीटकनाशकांची फवारणी करण्यासाठीचे नियोजन करण्यात येत आहे. विजय चौधरी म्हणाले की, स्व.पी.के. अण्णांनी सहकाराच्या माध्यमातून विविध प्रकल्पांची उभारणी केली. यामुळे परिसराचा कायापालट झाला भविष्यातही         या सर्व संस्था दिमाखदारपणे  वाटचाल करतील यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करणे गरजेचे     आहे. प्रास्ताविकात कार्यकारी संचालक पी.आर. पाटील यांनी यंदाच्या गाळप हंगामात साडेपाच लाख मेट्रीक टन गाळपाचे उद्दिष्ट असून त्यादृष्टीने ऊस तोडीचे व वाहतुकीचे नियोजन करण्यात आल्याचे सांगितले.