शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

सातपुडा साखर कारखाना पूर्ण क्षमतेने सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2019 12:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : सातपुडा साखर कारखाना पुर्ण क्षमतेने सुरू आहे. दैनंदिन साडेतीन ते चार हजार मे.टन ऊस ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : सातपुडा साखर कारखाना पुर्ण क्षमतेने सुरू आहे. दैनंदिन साडेतीन ते चार हजार मे.टन ऊस गाळप होत आहे. आतापर्यंत ५३,८१० मे.टन ऊस गाळप झाला आहे. जाहीर केलेल्या २३१५ रुपये भावाप्रमाणे ३० नोव्हेंबरपर्यंत गाळप झालेल्या उसाचे पेमेंट या आठवड्यात अदा केले जाणार असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील यांनी दिली.याबाबत माहिती देतांना चेअरमन दीपक पाटील यांनी सांगितले, यावर्षी सातपुडा कारखान्याचा ऊस तोडणी कार्यक्रमातील सुसूत्रता, ऊरा वजन याबाबतीत पारदर्शक धोरण असल्या कारणाने तसेच शेतक-यांचा बांधापर्यंत पोहचून ऊस लागवड, जोपासना याबाबतीत तज्ञांकडून मार्गदर्शन नियमित सुरु ठेवलेले आहे. उधारीने सेंद्रीय खतही उपलब्ध करून देण्यात येत आहे. तसेच ऊस जोपासनेकरीता लागणारे सल्फर वाजवी दरात शेतकन्यांना उपलब्ध करून देत आहे. अशाप्रकारे दर एकरी ऊस उत्पादकतेत वाढ होऊन शेतक-यांचा फायदा व्हावा याकरिता ऊस विकास धोरण कार्यक्षेत्रातील फक्त सातपुडा कारखान्यानेच अवलंबलेले आहे. याचाच परिणाम म्हणून यावर्षी सातपुडा सहकारी साखर कारखान्याकड़े ऊस पुरवठा करण्याचा कल वाढलेला आहे. याचीच भीती कार्यक्षेत्रातील खाजगी कारखान्याला भासवत असल्या कारणाने गाळप हंगाम सुरू झाल्यानंतर मध्येच ऊस दर ३० रुपये प्रती टनप्रमाणे वाढवून ऊस उत्पादकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केलेला आहे व सहकार तत्व आपल्या भागातून मोडीत काढून भविष्यात मनमानी कारभार करण्याचा प्रयत्नाचाच हा भाग आहे.कार्यक्षेत्रात फक्त सातपुडा कारखाना शेतकऱ्यांच्या शिवारावर जाऊन ऊस लागवडपासून ते ऊस तोड होईपावेतो मार्गदर्शन करतो. ऊस तोड मजूर, वाहन चालक किंवा कारखान्याचा स्टाफ शेतकरी बांधवांकडून कुठलीही आर्थिक मागणी करीत नसतात. शेतकऱ्यांनी पुरवठा केलेल्या ऊसाचे वजन मोबाईल एस.एम.एस. द्वारे वजन काटयावरूनच शेतकºयांना दिले जाते. दोन वर्षे अगोदर कार्यक्षेत्रात मुबलक ऊस उपलब्ध होता, कार्यक्षेत्रातील खाजगी कारखाने उभ्या ऊसाचा विचार न करता कारखाना बंद केले. मात्र सातपुडा हा एकमेव कारखाना असा होता की, शेतकºयांचा नोंद व बिगर नोंद उभा ऊस पूर्णपणे तुटेपर्यत तोटा सहन करून कारखाना सुरु ठेवला व करोडो रूपयांचे शेतकºयांचे नुकसान वाचविले. याउलट इतर कारखान्यांची काय स्थिती आहे हे समजून सांगण्याची गरजच नाही. त्याचा अनुभव प्रत्यक्षात येत आहे. आपण आपल्या कारखान्यामार्फत अनेक सुविधा उपलब्ध करून देत आहोत. एवढी सुविधा न देता केवळ दर वाढवून शेतकºयांची दिशाभूल करून सहकार क्षेत्र मोडीत काढण्याचा प्रयत्न आहे. आमीषाला बळी पडू नका व सातपुडा कारखाना जाहीर केलेल्या ऊस दराप्रमाणेच वेळेतच सर्व बिले अदा करणार आहे. तरी कारखान्याकडे नोंद केलेला ऊस कारखान्यासच द्यावा असे आवाहन चेअरमन दीपकभाई पाटील यांनी केले आहे.