शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

बोडका झालेल्या सातपुड्याला गतवैभवाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2020 12:29 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : सुमार वक्षतोडीमुळे सातपुडा पर्वत बोडका झाला आहे. बोडका झाला असला तरी पर्यटनासह अनेक विकास ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : सुमार वक्षतोडीमुळे सातपुडा पर्वत बोडका झाला आहे. बोडका झाला असला तरी पर्यटनासह अनेक विकास कामांसाठी हा भाग अनुकूल ठरत आहे. त्यामुळे वृक्षलागवड अथवा पर्यटन विकासाच्या योजना मंजूर होताच या भागात प्रशासन यंत्रणा मोहोचणे आवश्यक आहे. ज्यामधून या परिसरात पुन्हा गतवैभव प्राप्त होईल.नैसर्गिक संपदेने परिपूर्ण सातपुड्याच्या विकासात भर टाकण्यासाठी विविध योजनांच्या माध्यमातून प्रशासन तेथे पोहोचणे अपेक्षीत होते. परंतु प्रशासन यंत्रणेऐवजी वनसंपदा लाटणारा घटकच आधी तेथे पोहोचला. त्यामुळे या सातपुडा पर्वतरांगेचे आबाळ निर्माण झाले. वनसंपदा लाटण्याच्या उद्देशाने जाणाऱ्या स्वार्थी घटकाने या परिसराच्या भवितव्याचा कदापी विचार केला नाही. निव्वळ फायदा करुन घेण्याचा नितीमत्तेमुळे या घटकाने वन संपदेचा फायदा घेतल्यानंतर संवर्धनासाठी त्यांनी अंशभरही योगदान दिले नाही. परिणामी हा सातपुडा अगदी बोडका झाला आहे.लुटारुंशिवाय प्रशासनाला देखील सातपुड्यातील वनसंपदेचे संवर्धन केले पाहिजे, या भागाचे भवितव्य अबाधित ठेवले पाहिजे असे वाटलेच नाही. कुठल्याही एका घटकाने भवितव्याचा विचार केला असता तर कदाचित सातपुड्याची ही अवस्था झालीही नसती, असे धडगाव व अक्कलकुवा तालुक्यातील नागरिकांमार्फत सागण्यात येत आहे.या परिसर पर्यटनासाठी अत्यंत अनुकूल आहेत. परंतु कुठल्याही यंत्रणेने त्यासाठी पुढाकार घेतला नाही. त्यामुळे या भागाचे आबाळ अधिकच अवघड होत गेले आहे. पर्यटनाच्या दृष्टीने या भागाच्या विकासासाठी केवळ प्रशासन व नेत्यांची इच्छाशक्ती असणे आवश्यक आहे. त्यातून बोडका झालेला सातपुड्याला गतवैभव प्राप्त होऊ शकेल.सातपुडा हा चार राज्यांमध्ये पसरला असला तरी धडगाव व मोलगी परिसरात अनेक ऐतिहासिक स्थळे आहेत. या स्थळांचा देव-देवतांशी संबंध जोडले जात आहे. या स्थळांची पुढील पिढीला ओळख व्हावी, यासाठी या स्थळांचा विकास होणे नितांत आवश्यकता आहे.या भागात तोरणमाळसारखे काही ठिकाण आहे. त्यात धडगाव तालुक्यातील हातधुई येथील कोसळणाºया धबधब्यासह अन्य ठिकाणांचा उल्लेख करता येतो. हातधुईच्या धबधब्याचाही संबंध देवदेवताशी जोडले जात असून या घाटावर निसर्गपूजेवर आधारित गावदेवाची पूजा होते. महत्व प्राप्त त्यांचाही पर्यटनाच्या दिशेने विकास होणे आवश्यक आहे.तीन राज्यातून वाहणारी नर्मदा ही नदी सातपुड्यासह विंध्यपर्वत रांगेच्या मधोमध वाहत आहे. विंंध्यपर्वतचा भाग महाराष्टÑ अथवा नंदुरबार जिल्ह्याचा भाग नसला तरी नदीच्या दुसºया बाजूचा सातपुडा जिल्ह्यात येतो. त्यात धडगाव व अक्कलकुवा तालुक्यातील अनेक गावे येत आहे. त्यापैकी बहुतांश गावांचे सरदार सरोवरमुळे पूनर्वसन करण्यात आले असले तरी काठावरील अनेक गावांमध्ये आजही नागरिक वास्तव्यास आहे. त्यांच्यापर्यंत विकास पोहोचला नाही, तेही मुळ प्रवाहात येण्याच्या प्रतिक्षेत आहे.