लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शाळा बंद झाल्यापासून विद्यार्थ्यांना घरीच पोषण आहाराचे वाटप केले जात आहे. लॅाकडाऊनच्या काळात देखील शिक्षकांनी त्यांच्या शाळेतील विद्यार्थ्यांना घरपोच पोषण आहार वाटप केला. आता देखील शाळा सुरू झाल्या असल्या तरी शाळेत शिजवलेला पोषण आहार वाटप न करता विद्यार्थ्यांना घरीच तांदूळ, दाळ व कडधान्य दिले जात आहे. दरम्यान, दुर्गम भागातील शाळांमध्ये नियमित वाटप होत नसल्याच्या तक्रारी काही शाळांबाबत झाल्या आहेत. जिल्ह्यात जवळपास १८०० पेक्षा अधीक प्राथमिक व माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार वाटप केला जातो. कोरोनाच्या आधी शाळांमध्ये शिजवलेला पोषण आहार दिला जात होता. परंतु लॅाकडाऊन आणि कोरोनानंतर शाळा बंद झाल्याने विद्यार्थ्यांना तांदूळ, दाळ व कडधान्याच्या स्वरूपात पोषण आहार घरीच वाटप केला जातो.
फक्त तांदूळच नव्हे दाळ व कडधान्यही... जिल्ह्यात शाळा बंद असल्या तरी विद्यार्थ्यांना तांदूळच नव्हे तर दाळ व एक कडधान्य त्यांच्या उपस्थितीच्या सरासरीनुसार वाटप केले जात आहे. काही भागात केवळ तांदूळच दिला जात असल्याच्या तक्रारी होत्या. विशेषत: दुर्गम भागातील शाळांमध्ये मध्ये... परंतु त्या तक्रारींमध्ये चौकशीअंती तथ्य नसल्याचे स्पष्ट झाले.
जिल्ह्यातील एकुण लाभार्थी १,८२,९२०
शहरी लाभार्थी २५,६५६
ग्रामिण लाभार्थी १,५७,२६४
शाळांना विद्यार्थी संख्येनुसार मिळणारा पोषण आहार व विद्यार्थ्यांना दर महिन्याला वाटप केला जात आहे. लॅाकडाऊनमध्येही तो वाटप केला गेला होता. त्यामुळे अनेक संकट काळात कुटूंबांना आधार मिळाला होता.-जि.प.शाळा शिक्षक.