लोकमत न्यूज नेटवर्कवाण्याविहीर : अक्कलकुवा तालुक्यातील कोयलीविहीर कौलवी ते कौलवीमाळ रस्त्यावर सध्या होत असलेल्या पावसामुळे व मागीलवर्षी दरड कोसळून दगडी व मातीच्या मलबा साचला आहे. त्यामुळे घाट सेक्शनच्या रस्त्यावर वाहनधारकांना कसरत करीत वाहने काढावी लागत आहेत. अखेर शनिवारी पडत्या पावसातच कौलवीमाळचे सरपंच व आठ-दहा युवकांनी मातीच्या मलबासह मोठमोठे दगड सरकवून रस्ता सुरळीत करण्याचा प्रय} केला.अक्कलकुवा तालुक्यातील व सातपुडय़ाच्या घाट सेक्शनचा भाग असलेल्या कोयलीविहीर कौलवी ते कौलवीमाळ या रस्त्यावर गेल्यावर्षी पावसामुळे मातीच्या मलबा कोसळून पडला होता. मात्र वाहने निघून जात असल्याने त्याकडे दुर्लक्ष केले जात होते. मात्र आठ दिवसांपूर्वी पुन्हा पावसामुळे या रस्त्यावर दरडी कोसळून मोठमोठे दगड व मातीचा मलबा काही ठिकाणी साचला होता. त्यामुळे कौलवीमाळसह देवपाडा, केलीपाडा-1, पाटीलपाडा, केलीपाडा-2 या भागातील वाहनधारकांना त्रासदायक होवून वाहतुकीसाठी अडचणी निर्माण होत होत्या. मात्र याकडे संबंधित विभाग लक्ष देत नसल्याने अखेर शनिवारी पडत्या पावसात कौलवीमाळचे सरपंच कौशल्या गुमानसिंग तडवी, गुमानसिग बिज्या तडवी, पाटीलपाडा व केलीपाडा येथील माकत्या राश्या तडवी, विज्या पारशी तडवी, सुरूपसिंग पारशी तडवी, अशोक विद्या तडवी, सुरूपसिंग काल्या वसावे, धिरसिंग ईरमा वसावे, फत्तेसिंग रावजी वसावे यांनी फावडे, टिकम, तगा:या व खराटे असे साहित्य घेऊन स्वत: पडत्या पावसात घाट सेक्शन रस्त्यावर कोसळलेला मातीचा मलबा मोठमोठे दगड सरकवून वाहतूक सुरळीत केली. पावसामुळे बुजल्या गेलेल्या रस्त्याच्या बाजूच्या गटारीदेखील साफ करून घाट सेक्शनचा रस्ता सुरळीत करण्यासाठी प्रय} केले.दरम्यान, कोयलीविहीर कौलवी ते कौलवीमाळ रस्त्यावर मागीलवर्षी कोसळलेल्या दरडीमुळे रस्त्यावर साचलेली माती वर्षभर पडून होती. ही माती व दगड उचलण्यासाठी संबंधित विभागाकडून दुर्लक्ष झाल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
अक्कलकुवा व धडगाव तालुक्यातील अतिदुर्गम भागातील घाट सेक्शनसह इतर रस्त्यांवर पावसाळ्यात दरडी कोसळल्याने वाहतुकीचा प्रश्न दरवर्षी निर्माण होतो. काही रस्त्यांवर मोठय़ा दरडी कोसळून मोठमोठे दगड रस्त्यावर येतात. अशा रस्त्यांवर आठ आठ दिवस वाहतूक बंद राहते. परिणामी नागरिकांची दळणवळणासाठी प्रचंड गैरसोय होते. कोयलीविहीर ते कौलवीमाळ रस्त्यावर मागीलवर्षी दरड कोसळल्याने रस्त्यावर मातीचा मलबा साचला होता. मात्र वर्षभर जिल्हा परिषदेचा बांधकाम विभाग व सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष झाले. आता पुन्हा पावसाळ्यात माती व दगड रस्त्यावर पडल्याने वाहतूक बंद झाली होती. रस्त्यावर पडलेल्या या मातीवरुन वाहने घसरुन अपघातही होतात. मात्र वर्षभर संबंधित विभागाचे दुर्लक्ष झाल्याने नाराजी व्यक्त होत आहे. शेवटी कौलवीमाळचे सरपंच व युवकांनी माती व दगड उचलून रस्ता वाहतुकीसाठी सुरळीत केला. मात्र हा प्रश्न फक्त याच रस्त्याचा नसून अक्कलकुवा व धडगाव तालुक्यातील अनेक घाट सेक्शनच्या रस्त्यांवर पावसाळ्यात ही समस्या उद्भवते. त्यासाठी संबंधित विभागाने जेसीबी मशीनसह अद्ययावत स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित करण्याची गरज आहे.