शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबार पाणीदार करणार : सरपंच कार्यशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2019 11:25 IST

नंदुरबार : पाणी फाऊंडेशनतर्फे आयोजित स्पर्धेत नंदुरबार तालुक्यातील सर्वच गावांनी सहभागी होवून नंदुरबार तालुका पाणीमय करावा. यासाठी बचत गटांतील ...

नंदुरबार : पाणी फाऊंडेशनतर्फे आयोजित स्पर्धेत नंदुरबार तालुक्यातील सर्वच गावांनी सहभागी होवून नंदुरबार तालुका पाणीमय करावा. यासाठी बचत गटांतील महिलांनी लोकचळवळ उभी करावी असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी केले.जिल्हाधिकारी कार्यालय व सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने नंदुरबार तालुक्यातील पाणी फांऊंडेशनमध्ये सहभागी झालेल्या गावांतील सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहाय्यक, बचत गटांच्या महिला यांची एक दिवशीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.उदघाटन जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी यांनी दिपप्रज्वलनाने केले. अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी  होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून सहाय्यक जिल्हाधिकारी वान्मती सी. जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी डॉ. बी.एन. पाटील, उपजिल्हाधिकारी अर्चना पठारे, पाणी फांऊडेशनचे जिल्हा समन्वयक सुखदेव भोसले, गट विकास अधिकारी अशोक पटाईत, सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय व्यवस्थापक ए.के. धानापुणे, विभागीय वन अधिकारी आर.एम. जेजुरकर उपस्थित होते.डॉ. कलशेट्टी यांनी सांगितले, महिलांनी पुढे येवून या वॉटर कप स्पर्धेत आपले गाव सहभागी होण्यासाठी प्रय} करावा, पाण्याच्या बचतीसाठी लोकचळवळ उभी करावी व गावातील सर्व महिलांना या लोकचळवळीत सहभागी करुन घ्यावे असेही त्यांनी यावेळी सांगितले. पाण्याचा सर्व स्तरावर गरज लक्षात घेता शाळा, महाविद्यालय यांनी या स्पर्धेत सहभागी होवून लोकसहभागाच्या माध्यमातून मोठी चळवळ उभी करावी. महिलांनी वृक्ष लागवडीवर जास्त भर दिला पाहिजे. भविष्यात पाण्यासाठी महिलांच्या डोक्यावर हंडा दिसू नये यासाठी आतापासूनच पाण्याचे नियोजन करण्याची गरज असल्याचेही त्यांनी यावेळी   सांगितले.