शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

सरदार सरोवर प्रकल्प : पुनर्वसन वसाहतींच्या विकासासाठी 27 कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2018 12:21 IST

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : नंदुरबार जिल्हा जिल्हा परिषदेकडून सरदार सरोवर प्रकल्प बधितांच्या पुनर्वसन गावामधील पंचायतींना 27 कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. या निधीमुळे गेल्या 15-16 वर्षापासून दुरावस्था झालेल्या वसाहती आता विकसित होणार आहे. दरम्यान तालुक्यातील रेवानगर या ग्रामपंचायतीला साडेपाच कोटींचा निधी मिळाल्यानंतर ग्रापचायतीने रविवारी विकास कामांचा शुभारंभ केला.सरदार सरोवर प्रकल्पात ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : नंदुरबार जिल्हा जिल्हा परिषदेकडून सरदार सरोवर प्रकल्प बधितांच्या पुनर्वसन गावामधील पंचायतींना 27 कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. या निधीमुळे गेल्या 15-16 वर्षापासून दुरावस्था झालेल्या वसाहती आता विकसित होणार आहे. दरम्यान तालुक्यातील रेवानगर या ग्रामपंचायतीला साडेपाच कोटींचा निधी मिळाल्यानंतर ग्रापचायतीने रविवारी विकास कामांचा शुभारंभ केला.सरदार सरोवर प्रकल्पात विस्थापित झालेल्या कुटूंबाचे अक्कलकुवा,  तळोदा व शहादा तालुक्यातील एकूण 11 वसाहतींमध्ये पुनर्वसन करण्यात आले आहे. यात देवमोगरा, सरदार नगर, नर्मदानगर, रेवानगर, रोझवा पुनर्वसन, गोपाळपूर पुनर्वसन, तर्हावद पुनर्वसन, वाडी पुनर्वसन, चिकली व वळछील या वसाहतीचा समावेश आहे. या सर्व वसाहती नर्मदा विकास विभागाने नंदुरबार जिल्हा परिषदेकडे वर्ग केल्या आहे. मात्र जिल्हा परिषदेकडे वर्ग होऊन ही वसाहतींना आता पावेतो निधी दिला नव्हता सहाजिकच विकासाआभावी प्रचंड दुरवस्था झालेली होती. जेव्हा जेव्हा हे प्रकल्पग्रस्त निधीची मागणी करीत होते या दोन्ही यंत्रणा आपल्या ताब्यात नसल्याची सबब पुढे कडून हात जटकत होते. त्यानंतर विस्थापितांनी निधीबाबत वरिष्ठ प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता. यासाठी मोर्चे, उपोषण या सारखे हत्यार उपसले होते त्यानंतर जिल्हा प्रशासनाने नर्मदा विकास विभाग व जिल्हा परिषद या यंत्रणांची बैठक बोलावली त्या वेळी नर्मदा विकास विभागाने 27 कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार करून शासनाकडे पाठवला होता. हा  प्रस्ताव वर्षभर रखडल्यानंतर गेल्या वर्षाअखेरीस हा निधी जिल्हा परिषदेकडे वर्ग केला. त्यानंतर जिल्हा परिषदेने या ग्रामपंचायतीकडे प्रत्यक्ष निधी दिला आहे. सदर निधी प्राप्त झाल्यामुळे आता या पंचायतीं मधील विकास कामांना चालना मिळणार असून, पंचायती विकासाची काट टाकणार आहे. रेवानगर ग्रामपंचायत वगळता प्रत्येक ग्रामपंचायतीना अडीच ते साडे तीन कोटी वितरित करण्याचे सांगितले. दरम्यान, रेवानगर ग्रामपंचायतीने रविवारी साडेपाच कोटी रुपयांच्या विविध विकास कामाचे भूमिपूजन उपसरपंच तथा ग्रामशिक्षण समितीचे अध्यक्ष दाज्या पावरा यांच्या हस्ते केले.  या वेळी डॉ.कांतीलाल टाटीया, नर्मदा विकास विभागाचे संदीप सोनवणे, पंचायत समितीचे सदस्य लाख्या पावरा, पोलीस पाटील रेंज्या पावरा, माजी सरपंच बारक्या पावरा, दृश्या पावरा, लोसरा पावरा, राण्या पावरा, सभलाल पावरा, आपसिग पावरा, लुफिन फाऊंडेशनचे लक्ष्मण खोसे उपस्थित होते.या निधीतून पंचायतीने अंतर्गत रस्ते, जोड रस्ता, पूल, बसस्थानक, पाणीपुरवठा, शासकीय इमारती दुरुस्ती व सार्वजनिक शौचालय दुरुस्तीचे कामे हाती घेतली आहे दरम्यान रेवानगर हे गाव आदर्श आमदार गाव म्हणून ही निवडण्यात आलेले आहे.