शहरं
Join us  
Trending Stories
1
भर उन्हाळ्यात दिल्ली पाण्यात बुडाली; पावसाचा कहर, जागोजागी पाणी तुंबले
2
मान्सूनची घाई, वेळेआधीच केरळ गाठले; राज्यात २ दिवसांत; २००९ नंतर प्रथमच आठवडाभर आधी आगमन
3
आजचे राशीभविष्य २५ मे २०२५ : धन- संपत्ति, मान - सन्मानाची प्राप्ती
4
केंद्र अन् राज्यांनी ‘टीम इंडिया’प्रमाणे काम केल्यास काहीही अशक्य नाही; PM मोदी यांचे आवाहन
5
काळजी नको, सगळे सुरळीत होईल; राहुल गांधींचा दिलासा, सीमाभागातील मृतांच्या कुटुंबांचे सांत्वन
6
५ वर्षांत एक ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे लक्ष्य; 'महाराष्ट्राचेही व्हिजन २०४७': CM फडणवीस
7
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आग्रही; पण विधिमंडळाच्या नीतिमूल्य समितीची अद्याप प्रतीक्षाच
8
मुंबई, पुणे, नागपूरसह ७ जिल्ह्यांतून ५४ टक्के उत्पन्न; विकासाच्या प्रादेशिक असंतुलनावर बोट
9
हगवणेंकडून पिस्तुले, चांदीची भांडी, कार जप्त; CM फडणवीस, DCM शिंदेंकडून कुटुंबाचे सांत्वन
10
संततधारेने पिकांना मोठा फटका; बळीराजा संकटात, अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता
11
ॲपलला भारतात जायचे असेल तर जावे, पण अमेरिकेत फोनवर कर लागणारच; ट्रम्प यांचा धमकीवजा इशारा
12
कीव्ह शहरावर रशियाचे ड्रोन, क्षेपणास्त्र हल्ले; १५ जखमी, ओबोलोन जिल्ह्याचे सर्वाधिक नुकसान
13
रुग्णासाठी चॅटजीपीटी बनले वकील, बिनतोड युक्तिवादाने मिळवून दिला २ लाखांचा रिफंड
14
पनवेल-सोमटणे, पनवेल-चिखली नवीन कॉर्ड लाइन; राहुरी-शनी शिंगणापूर नव्या रेल्वे मार्गास मान्यता
15
‘फिरत्या पम्पिंग स्टेशन’मुळे पाण्याचा लवकर निचरा; ४ वर्षांसाठी भाडेतत्त्वावर, ८ कोटी खर्च
16
‘विरार-अलिबाग’ विलंबाचा दिल्ली एक्स्प्रेसवेला फटका; ठाण्यात होणार अवजड वाहनांमुळे कोंडी
17
PBKS vs DC : दिल्लीकर समीरची मॅच विनिंग फिफ्टी; पंजाबचं टेन्शन वाढलं! Qualifier 1 च्या शर्यतीत नवं ट्विस्ट
18
Vaishnavi Hagawane: वैष्णवीच्या बाळाला एकनाथ शिंदेंनी घेतलं जवळ, आईवडिलांना दिला धीर; काय घडलं?
19
IPL 2025 Qualifier 1 Race : आता MI चे कट्टर चाहतेही करतील CSK ला चीअर; कारण...
20
हे वागणं बरं नव्हं... खासदारांनी नाराजीचा सूर आळवत रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना धरले धारेवर 

सरदार सरोवर विस्थापीतांची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2019 20:58 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : सरदार सरोवर विस्थापितांच्या विविध मागण्यांसाठी शेकडो विस्थापितांनी आंदोलनाच्या  नेत्या मेधा पाटकर यांच्या उपस्थितीत शुक्रवारी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : सरदार सरोवर विस्थापितांच्या विविध मागण्यांसाठी शेकडो विस्थापितांनी आंदोलनाच्या  नेत्या मेधा पाटकर यांच्या उपस्थितीत शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. काही काळ जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवर आंदोलन करण्यात आले. जिल्हाधिकारी व संबधीत विभागाच्या अधिका:यांच्या उपस्थितीत सायंकाळी उशीरार्पयत चर्चा सुरूच होती. नर्मदा खो-यातील आदिवासींचे पुनर्वसन 34 वर्षापासून सुरू आहे. यासाठी नर्मदा आंदोलनाने सत्याग्रही मागार्ने लढा देत मोठ्या प्रमाणावर पुनर्वसनाच्या सुविधा मिळविल्या आहेत. असे असले तरी अजूनपयर्ंत शेकडो आदिवासींना त्यांचे पुनर्वसनाचे हक्क अर्धे वा पूर्ण देणे बाकीच आहे. नर्मदा लवादाचा निवाडा, सर्वोच्च न्यायालयाचे 2000 व 2005 चे निकाल यानुसार ‘पुनर्वसन आधी, नंतरच संपत्तीचे बुडित’ हे तत्व नियम म्हणून मान्य असताना प्रत्येक टप्प्यावर आदिवासींना बेकायदेशीर बुडिताविरुध्द लढूनच कमी अधिक न्याय मिळाला आहे. 2017 चा निर्णय म्हणजे आदिवासींचा अपमान असल्याची भावना नर्मदा आंदोलनाची आहे. आंदोलनाच्या म्हणण्यानुसार, लोकार्पण झालेल्या या धरणाचा आजही मध्यप्रदेश, महाराष्ट्र, गुजरात मिळून सुमारे 30 हजार कुटुंबे असताना ‘मध्यप्रदेशातील संख्येचा खेळ तर महाराष्ट्राने व्यर्थ दवडला वेळ’ अशी हकीकत आहे. आजही अनेकांना जमीन मिळणे बाकी, कित्येकाना घरप्लॉट मिळणे बाकी तर वसाहतीत अनेक सोयी अगदी पिण्याच्या पाण्यापासून ते सिंचनापयर्ंत सोयींचा प्रश्न भिजत घोंगडेच आहे. मूळ गावातच पाडय़ापाडय़ांवर आदिवासी त्यांची शेती, जंगल आणि नर्मदा नवनिमार्णाच्या जीवनशाळा आजही सुरू आहेत.  स्थलांतरित झाल्यावरही घरप्लॉट न मिळता वा जमिनी शोधत फिरता आदिवासींनी या वर्षीही बुडित भोगायचे का. असा प्रश्न आहे. 8 फेब्रुवारी 2017 च्या सुप्रीम कोर्टाच्या निकालानुसार मे 2017 पयर्ंत महाराष्ट्र, गुजरात व मध्यप्रदेशानेही पुनर्वसनाचे कार्य पूर्ण करायचे होते. मात्र दिरंगाई, तक्रार निवारण अधिका-यांच्या वारंवार बदल्या, काहींची अक्षम्य दिरंगाई, तक्रार निवारण प्राधिकरणाच्या निर्णयांनाही जरुरीपेक्षा जास्त वेळकाढूपणा, सुनावण्या होऊन आदेश नसणे, आदेश होऊनही अंमल नाही आणि गुजरातकडूनच पर्याप्त अर्थसहाय्य नाही यामुळे आजही लढावेच लागते आहे. अशा परिस्थितीत नंदुरबार जिल्हाधिका-यांनी संवाद सुरु ठेवला व पुढे नेला. सर्व मागण्या मान्य केल्या. काही मंत्रालयाकडे निर्णयासाठी प्रलंबित ठेवल्या. मात्र अखेरीस ज्यांना ज्याना पुनर्वसनाची जमीन  व घरप्लॉटच मिळणे बाकी आहे त्यांना जगणेच मुश्कील आहे. आंदोलकांच्या म्हणण्यानुसार, पुनर्वसन पूर्ण होईपयर्ंत धरणात पाणी भरून बुडित आणता येणार नाही. प्रत्येक प्रलंबित अर्जावर निकाल देणे व अंमल करणे पावसाळ्यापूर्वीच होणे गरजेचे आहे. सर्वोच्च न्यायालयाची अवमानना करणे महाराष्ट्र शासनाला जडच जाईल. सर्वात महत्वाचे म्हणजे, आदिवासींच्या जगण्याच्या व उपजीविकेच्या अधिकारावर गदा आणणे हा अनुसूचित जाति-जनजातींवरील अत्याचार व कायद्यानुसार गुन्हाच आहे. या परिस्थितीत जिल्हाधिका:यांसह अनेक बैठका झाल्यानंतर पावसाळयापूर्वीच इशारा कार्यक्रम म्हणून शेकडो आदिवासी नंदुरबारमध्ये येऊन धडकले आहेत. आंदोलकांनी ठाम निर्धार करीत आज जिल्हाधिकारी कार्यालयात चर्चा नाही तर प्रत्येकजण आपापले शपथपत्र बनवून आपला अधिकार व शासनाचे कर्तव्य कायदेशीर प्रक्रियेने उघडकीस आणण्यासाठी आले असल्याचे निवेदनात स्पष्ट केले. आपापल्या गावी वा वसाहतीत परतण्यापूर्वी शासनाला पुन्हा एकदा ‘डूबेंगे पर, हटेंगे नही’ं चा इशारा व समयबद्ध कार्याविना बुडित येऊ दिलं तर कठोर सत्याग्रहाची घोषणा असल्याचे सर्वांनी निक्षून सांगितले. शेकडो आदिवासी कलेक्टर कार्यालयात घुसल्यावर बिरसा मुंडा सभागृहात चर्चा करण्यात आली. सायंकाळी उशीरार्पयत चर्चा सुरूच होती. जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे, अपर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे, दत्तात्रय बोरुडे यांच्यासह संबधीत विभागाचे अधिकारी व तहसीलदार उपस्थित होते. आंदोलकांतर्फे आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर, चेतन साळवे, विजय वळवी, ओरसिंग पटले, नूरजी वसावे, पुण्या पाडवी, किरसिंग जेरमा वसावे, लालसिंग वसावे, सुनील पावरा, गंभीर पाडवी, खेत्या पावरा, मान्या पावरा, गुलाबसिंग वसावे, गुंबा पाडवी, भुरा वसावे, वेस्ता पावरा, लतिका राजपूत, पाणकीबाई वसावे आदींसह शेकडो विस्थापीत उपस्थित होते.