सारगंखेडा येथील शारदा विद्यामंदिरातील इंग्रजी विषयाचे शिक्षक शैलेंद्रसिंग नयनसिंग देशमुख (४३, रा. अमोदा, ता. शिरपूर) यांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांच्यावर सुमारे महिनाभर धुळे येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. पुढील उपचारासाठी नाशिक येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र दीड महिना कोरोनाशी झुंज देताना ते हरले व उपचार सुरू असताना २३ मे रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास त्यांचे निधन झाले. मनमिळावऊ व विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून ते परिचित होते. त्यांनी ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमेंतर्गत घरोघरी सर्वेक्षणाच्या कामातही सहभाग घेतला होता. शासनाने त्यांच्या परिवाराला आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी नातेवाईक व परिवाराने केली आहे. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ असा परिवार आहे.
सारंगखेडा येथील शिक्षकाची कोरोनाशी झुंज अयशस्वी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:31 IST